जगभरातील बुद्ध धम्म

२००० हजार वर्षांपूर्वीचा ‘व्हाईट हॉर्स विहार’ ; हा इतिहास प्रत्येक भारतीयाला माहिती असणे गरजेचे

व्हाईट हॉर्स विहार चीनच्या हेनान प्रांतातील लुओयांग शहरात आहे. चीनमधील हे एक सरकारी बौद्ध विहार असून चिनी आणि भारतीय संस्कृतींचे संगमस्थळ अशी या विहाराची ओळख आहे. दोन देशाच्या मैत्रीपूर्ण संस्कृतीचे प्रतीक असून भारताचे अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या विहाराला भेट दिली आहे. व्हाईट हॉर्स विहाराचा इतिहास २००० हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा थेट संबंध भारताशी येतो. […]

श्रीलंकेत बुद्ध धम्माचा प्रवेश कधी झाला? श्रीलंकेचे प्राचीन नाव जाणून घ्या!

ठिकऱ्या उडालेल्या बुद्ध शिल्पाची केली जुळवाजुळव

अमेरिका-युरोपातील लोक बुद्ध धम्माकडे आकर्षित होण्यामागचे ‘हे’ तीन प्रमुख कारणे

अफगाणिस्तानात पुन्हा बुद्ध हसणार; कुशाण काळातील बौद्ध स्तूपाची दुरुस्ती सुरु

जगाला भारताची आठवण भगवान बुद्धामुळेच होते

अबब…’या’ देशात एकाचवेळी ३० हजार भिक्खूंना दिले दान

ब्लॉग

२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी – थोटलाकोंडा, विसाखापट्टनम – प्रा.हरी नरके

देशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. थोटलकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे […]

दलित हिंदू नाही म्हणत ‘या’ अस्पृश्य नेत्याने १८९८ साली धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती

बौद्ध भिक्खूंना लेण्यां दाखवा; त्यांनी पुढे येऊन लेण्यांबाबत मार्गदर्शन केले पाहिजे

ब्लॉग

“पांडव बौद्ध होते का?”

माझ्यासारख्या अनेक इतिहास आणि लेणींमध्ये रुची असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जगभरातल्या संशोधकांनी मान्य केले आहे कि पांडवांचे कुठलेही पुरातत्त्वीय अथवा ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही आणि जे काही साहित्यात उपलब्ध आहे ते “मिथक” या प्रकारात मोडते. मात्र तरीही समजा थोड्यावेळ आपण पांडव होऊन गेले असे गृहीत धरले, तर पांडव त्यांच्या वनवास काळात […]

दुःखं आमचं, संघर्ष आमचा आणि जीव पण आमचाच जातोय…मग स्टेजवर सवर्ण ब्राह्मण का आहेत?

जपानी भिक्खू यांनी जुन्नर लेणी (लेण्याद्री) येथे केली बुद्ध वंदना

बुद्ध लेणीं ते पांडव लेणीं – एक प्रवास

भारतातील सर्वात प्राचीन वास्तू (एखाद दुसरा अपवाद वगळता) या येथील पाषाणात कोरलेल्या "बुद्ध लेणीं" आहेत. हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय सत्य आहे. सम्राट अशोकाने बाराबार आणि नागार्जुनी डोंगरात (आत्ताच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात) सर्वात पहिल्यांदा लेणीं कोरून दान दिली. त्यानंतर ही अतिशय अभिनव कला इतर प्रदेशात रुजू लागली. महाराष्ट्रात पाषाणाच्या प्रचंड मोठी डोंगरांची रांग या कलेला पोषक ठरली आणि भारतातील सर्वात जास्त लेणीं येथील अनेक डोंगरांच्या खांद्यावर दिमाखात दिसू लागली. विनयानुसार बौद्ध भिक्खुंनी भिक्षाटन केल्यानंतर संपूर्ण वेळ एकांतात ध्यान आणि अभ्यासासाठी व्यतीत करायचा असतो. हे भिक्खू डोंगरातील या लेणींमधे राहत असत. स्थानिक लोकांना त्यांना "भिक्खू" म्हणतात हे कदाचित माहीत नसावे. तेव्हा

लेण्याद्रीचे मूळ नाव काय?

महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जाखीणवाडी बुद्ध लेणी (जाखीणवाडी हे कऱ्हाड येथील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत. जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे

लेण्यांचे नकाशे तयार करा..!

लेणी बघण्याची आवड समाजात निर्माण होत असून अनेक कुटुंब व ग्रुप तेथे बघण्यास, अभ्यास करण्यास व दीप लावण्यास जात असतात. पण बहुतेकांना त्या स्थानाची भौगोलिक माहिती ज्ञात नसते. अक्षांश व रेखांश काय आहे याची माहिती नसते. समुद्रसपाटीपासून त्या स्थळांची उंची किती हे माहीत नसते. यासाठी लेण्यांचा परिपूर्ण शास्त्रशुद्ध नकाशा जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपने तयार करणे गरजेचे आहे. गड, किल्ले यावर ट्रेकिंगला जाणाऱ्या संस्थांनी त्यांचे नकाशे तयार केले आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील डोंगरकपारीत असलेल्या सर्व लेण्यांच्या मार्गांचे नकाशे तयार केले पाहिजेत. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कंपास असतो. त्याचा बाण हा नेहमी उत्तर दिशा दाखवितो. त्यामुळे त्या दिशेस तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला पश्चिम,

तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’

महाराष्ट्रात लेण्यांचे भांडार आहे. व त्यांच्या ठिकाणावरून प्रत्येक लेण्यांची नावे वेगवेगळी आहेत. मात्र हरेक ठिकाणी त्याला स्थानिक लोक पांडव लेणी म्हणतात. आता महाभारतातील पांडव या सर्व लेण्यांच्या ठिकाणी कसे राहिले असतील या प्रश्नाचा कोणी विचार करीत नाही. लेण्यांमध्ये स्तुप आहे, शिल्पे कोरलेली आहेत, ब्राम्हीलिपीतील माहिती आहे, तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे 'आयत्या बिळावर नागोबा' या म्हणी प्रमाणे 'आयत्या लेण्यांवर पांडोबा' असे म्हटले पाहिजे. आपल्याकडे रूढ झालेली पद्धत डोळे मिटून पिढ्यानपिढ्या चालू राहते. चिकित्सा करायची नाही. सर्व भारतभर हेच चालू आहे. लेण्या, गुहा दिसल्या की डोळे मिटून म्हणायचे की ही पांडवांची जागा आहे. नुसता भारत नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा तक्षशिला या

आंध्रप्रदेशातील बेलम गुहेत बौद्ध भिक्खू दीड-दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव्यास होते

आंध्रप्रदेश मध्ये १८८४ साली ब्रिटिश सर्वेअर रॉबर्ट ब्रूस फुट याने कुर्नूल जिल्ह्यामध्ये बेलम गावाजवळ डोंगराळ प्रदेशात एक गुहा शोधली. ही गुहा जवळ जवळ ३२२९ मीटर लांब आहे. त्यानंतर शंभर वर्षे या गुहेकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र १९८२ ते १९८४ मध्ये जर्मनी वरून गुहांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या ( Speleologist ) टीमने या गुहेचे संपुर्ण सर्वेक्षण केले. तेव्हा येथे साडे चार हजार वर्षापूर्वीचे काही अवशेष सापडले. तसेच येथे बौद्ध भिक्खू दीड-दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव्यास होते याचा पुरावा मिळाला. तेथील उत्खननात सापडलेल्या अस्थी अनंतपुर येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत. हे पण वाचा : आंध्रप्रदेशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी सापडली या गुहेचे महत्त्व

आंध्रप्रदेशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी सापडली

आंध्रप्रदेशातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी हे ४ ऑगस्ट रोजी रविवारी हेरिटेज जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत सर्वेक्षण करत होते. विजयवाडापासून जवळच असलेल्या मोगलराजपूरम येथे सर्वेक्षण करत असताना धानमकोंडा टेकडीवर त्यांना कठीण खडकात कोरलेली इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी आढळली. सध्या सीसीव्हीए अंतर्गत आंध्रप्रदेशात पुरातन वारसा जतन जागरूकता मोहीम सुरु आहे. डॉ. रेड्डी यांच्यासह बौद्ध वारसा जतन करणारे कार्यकर्ते आणि एपी सोसायटी फॉर प्रिजर्व्हन ऑफ बौद्ध हेरिटेजचे अध्यक्ष सुभाकर मेदसानी यांनी जमिनीपासून २०० फूट उंचीवर असलेल्या डोंगरावर चढून ही बौद्ध लेणी शोधून काढली. लेणीचे मोजमाप केले असता १५ फूट लांबी, उंची १६ फूट

ताज्या पोस्ट

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात साईबाबांविषयी काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं? हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात शोधलं असता २४ जानेवारी १९५४ रोजी साईभक्त संमेलनाच्या उदघाटन समारंभातील एक भाषण उपलब्ध आहे. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. यासाठी ते वेगवेगळ्या देशांत, शहरांत गेले. तिथं […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांना ‘बायबल’ विषयी असलेले ज्ञान पाहून ख्रिश्चन धर्मगुरूला घाम फुटला…

१९३५ ला येवला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही.’ अशी घोर प्रतिज्ञा केली होती. त्यांनतर बाबासाहेबांच्या मागे सर्व धर्माचे धर्मगुरू आपला धर्म किती श्रेष्ठ आहे, असे सांगून आपल्या धर्माचा स्वीकार करावा अशी विनंती करू लागले. यामध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक सुद्धा बाबासाहेबांना आपल्या धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले होते. याबद्दल हा किस्सा वाचा… […]

बातम्या

थायलंडमध्ये माघपौर्णिमा उत्सव सुरू

थायलंडमध्ये आजपासून तीन दिवसांचा माघ पोर्णिमा पूजा उत्सव सुरू झाला. हा उत्सव ८ ते १० फेब्रुवारी असा तीन दिवस असून या निमित्त संपूर्ण थायलंडमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असून सर्व शासकीय कार्यालये आणि मद्यपान गृहे बंद राहणार आहेत. ही माघ महीन्याची पौर्णिमा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यादिवशी विहारातील भिक्खूंना खास करून भात शिजवून […]

स्पेनमध्ये उभारणार ४० मीटर उंचीची बुद्धमूर्ती; महाराष्ट्रापेक्षा छोटा देश करतोय सहकार्य

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक युवतीसाठी १८ जानेवारीला मोफत उद्योजकता कार्यशाळा 

अधिकृत फेसबुक पेज – लाईक करा

error: Content is protected !!