बातम्या

हरियाणात जाहीरपणे पहिल्यांदाच बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला

मुंबई : भन्ते अयूपाल यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून हरियाणा मध्ये पहिल्यांदाच बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला असल्याची माहिती दिली आहे. भन्ते अयूपाल यांच्या हस्तेच हरियाणातील पहिला बौद्ध विवाह संपन्न झाला आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की,आपल्या सर्वांसाठी एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद धम्म वार्ता. साधारणतः हरियाणातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायांसह मागील तीन वर्षांपासून […]

बुद्ध तत्वज्ञान

आपण रागात असताना चढ्या आवाजातच का बोलतो? यावर भगवान बुद्ध म्हणाले…

एकदा तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, “आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?” सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो.” यावर गौतम बुद्ध म्हणाले, “पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती […]

ब्लॉग

पेशवे साम्राज्याची अखेरची रात्र : भिमा कोरेगावची लढाई – १ जानेवारी १८१८

५ नोहेंबर १८१७ रोजी पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली, आणि बाजीराव पेशव्याची महाराष्ट्रावर असलेली जुलमी सत्ता पुढे लवकरच अल्पावधीत संपुष्टात आली. हे युद्ध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ३१ डिसेंबर १८०२ रोजी पेशवे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला तह बाजीरावाने मोडला. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांना पेशवे काही […]

बातम्या

बौद्ध शिल्प गहाळ झाल्यास येथे नोंद करा

बिहारमध्ये ठिकठिकाणी गावोगावी बुद्धांची अगणित शिल्पे सापडत आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे अनेक शिल्पांची नोंद नसल्यामुळे त्यांच्या चोऱ्या होत आहेत. अशा बुद्धमूर्तींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे या टोळ्या स्थानिक चोरांना हाताशी धरून मूर्त्यांची चोरी करतात. आणि यामध्ये काही देशद्रोही गावकरी सुद्धा सामील असतात. बिहारमध्ये डिसेंबर २०१४ मध्ये नालंदाजवळ दिपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रणबिघा गावांमध्ये एकेदिवशी सकाळी […]

इतिहास

सम्राट अशोकाने तक्षशिला येथे बांधलेल्या महान ‘धर्मराजिका’ स्तूपाचा इतिहास

धर्मराजिका स्तूप ज्याला तक्षशिलाचा महान स्तूप देखील म्हटले जाते, इ.स.पू. ३ ऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या अस्थींचे जतन करण्यासाठी हा स्तूप बांधला होता. पुढील शतकांमध्ये या स्तूपाला आणखी मजबूती देण्यात आली आणि त्यासाठी मूळ बांधकामाच्या भोवताली लहान लहान गोलाकार स्तूप बांधले गेले आणि इतरही काही बांधकामे केली गेली. इंडो-ग्रीक राजा दुसरा झॉयलस यांच्या […]

बातम्या

तुमची लेणी बघायला कुत्र पण येत नाही…माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

जुन्नर : जुन्नर तालुक्यात भारतातील सर्वात जास्त लेणी असून हा वैभवशाली ऐतिहासिक वारसा जुन्नरला लाभला आहे. अनेक देश विदेशातील अभ्यासक,पर्यटक लेणी पाहण्यासाठी येत असतात.लेणीवर जाण्यासाठी योग्य मार्ग नसतानाही ते येथे येतात. मात्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘तुमची लेणी बघायला कुत्रही येत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य करून बौद्ध लेणी अभ्यासक, संशोधक आणि लेणी प्रेमींचा […]

जगभरातील बुद्ध धम्म

अफगाणिस्तानात पुन्हा बुद्ध हसणार; कुशाण काळातील बौद्ध स्तूपाची दुरुस्ती सुरु

अफगाणिस्तान देशातील पारवान प्रांतातील चारीकर जवळ असलेला टोपदारा स्तूप हा इसवीसन चौथ्या शतकाच्या आसपास बांधलेला असल्याचा अंदाज आहे. 2016 पासून अफगाण कल्चरल हेरिटेज कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन (एसीएचसीओ) मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन स्तूप साइट दुरुस्ती आणि संवर्धन करीत आहे. टोपदारा स्तूप हा कुशाण शासक कनिष्क यांच्या काळातील असण्याची शक्यता आहे. या स्तूपाची मुख्य रचना ही दगडी असून त्याचा […]

ब्लॉग

प्रतिक्रांतीच्या विळख्यात भगवान बुद्ध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये धम्मचक्र प्रवर्तन करून, भारतीय विचार परंपरेच्या ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ संस्कृतीचा परीघ पूर्ण केला. त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देऊन भारतीय जनतेनेभारतीय विचार परंपरा व संस्कृतीवर बसलेली वैदिक धूळ झाडून काढायला सुरूवात केली. बहुजन संस्कृतीच्या पुनर्रचनेचे हे कार्य अद्यापही सुरू आहे. भारतीय राज्यघटनेच्या स्वीकाराने ही प्रक्रिया अधिकच गतिमान झाली.’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ […]

इतिहास

बौद्ध ग्रंथांमध्ये महान वैद्य ‘जीवक’ यांच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते

आचार्य जीवक हे बुद्धाच्या समकालीन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. बर्‍याच बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जीवंत सापडले म्हणून त्यांचे नाव ‘जीवक’ ठेवण्यात आले होते. जीवक यांच्या जन्मापासून ते महान वैद्य असा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ… भगवान बुद्धांच्या काळात वैशाली एक अत्यंत संपन्न गणराज्य होते. तेथे गणिका आम्रपाली अभिरूप, परम रूपवती, […]

इतिहास

सम्राट अशोक राजाचा महाल कुठे आहे?

दोन हजार वर्षांपूर्वीचा भारताचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजा याने असंख्य ठिकाणी शिळेवर, स्तंभावर, गुहेमधून, प्रस्तारावर कोरून ठेवलेल्या लेखांच्या रुपाने एक विश्वसनीय व चिरस्थायी इतिहास लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे सम्राट अशोकाचा अफाट राज्यविस्तार, त्याची राज्यपद्धती, त्याची धर्मपरायणता, त्याचे प्रजावात्सल्य, त्याचा अपूर्व स्वार्थत्याग आणि मनाची थोरवी दिसून येते. तसेच त्याने प्रजेमध्ये धर्मज्ञान, सदाचार आणि भूतदया इत्यादींचा प्रसार […]