जगभरातील बुद्ध धम्म

इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थचे घर होणार बौद्ध विहार

इंग्लंडचा शेक्सपियर, जर्मनीचा गटे व शिलर, तसेच रशियाचा पुष्किन या प्रतिभावंत साहित्यिकांमुळे त्या त्या देशातील लोकांचे जीवन पिढ्यान्पिढ्या व्यापून गेले आहे. विल्यम शेक्सपिअर यांच्याप्रमाणे विल्यम वर्डस्वर्थ या रोमँटिक आणि सौंदर्यवादी कवीचा दबदबा देखील इंग्रजी साहित्यात आहे. पाच भावंडात त्याचा नंबर दुसरा होता. वडील जॉन वर्डस्वर्थ मुलांना कविता शिकवीत, त्यामुळे त्यांच्यात कवितेची आवड निर्माण झाली. सन […]

ब्लॉग

“दिव्यावदानम्” कथा – किती खरी, किती काल्पनिक

सध्या संजीव सन्याल यांचा एक विडिओ प्रसारित झाला आहे ज्यात सम्राट अशोकांच्या अस्तित्वावर आणि कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुळात सन्याल हे पंतप्रधान कार्यालयात principal economic advisor म्हणून काम करतात. ते खरं तर “बुद्धिभेद” करण्याचा प्रयत्न करतायेत हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. सम्राट अशोकाच्या कर्तृत्वावर तसेही सध्याचे राजकीय सत्तेदार अनुकूल नाही किंबहुना त्यांना सम्राट […]

ब्लॉग

हे आत्मचरित्र कदाचित भारतातील सर्वात प्राचीन व विश्वसनीय असा ऐतिहासिक दस्तैवज

“सिंहसेनापती” हे खरेतर महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी अनुवादित केलेले ‘वैशाली’ गणराज्याचा पराक्रमी सेनापती ‘सिंह’ याचे इ. स. पूर्व ५०० मध्ये मातीच्या तब्बल १६०० वीटांवर (Clay Tablets) बुद्धकालीन धम्मलिपीत लिहिलेले जगातील पहिले आत्मचरित्रच ठरेल. याचा शोध एका उत्खननामध्ये स्वतः महापंडित राहुल सांकृत्यायन यांनाच लागलेला आहे. या सर्व वीटा पाटणा वस्तुसंग्रहालयात आजही सुरक्षित ठेवलेल्या आहेत. सेनापती ‘सिंह’ […]

इतिहास

इतिहासाचे नवीन पुराव्यांच्या आधारे पुनर्लेखन होणे गरजेचे

वाकाटक नृपती ‘द्वितीय पृथ्वीसेन’ याची राजमुद्रा. ही राजमुद्रा ‘नंदिवर्धन’ अर्थात आताचे नगरधन, येथील शेवटचा मुख्य वाकाटकवंशीय नरेश ‘पृथ्वीसेन द्वितीय’ याची असून, या तांब्याच्या राजमुद्रेवर कमलपुष्पात अधिष्ठित असलेल्या ‘तारा’ या बौद्धधर्मातील रक्षकदेवतेची ‘उलटप्रतिमा'(Mirror Image) कोरलेली असून, तिने मस्तकी मुकूट धारण केलेला असून, गळ्यात मौल्यवान अलंकार आहेत. तसेच, तिच्या डाव्या हातात देठासह पूर्ण उमललेले कमळ धारण केलेले […]

बातम्या

भदंत सदानंद महाथेरो यांनी केलेले धम्माचे कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील – डॉ.हर्षदीप कांबळे

भारतात धम्माला वाढवण्यात भदंत सदानंद महाथेरो यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जीवनाचे ध्येयच भारतात बुद्ध धम्म वाढवण्याचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरात बौद्ध धम्माला दिशा देण्याचे कार्य भन्तेजींनी केले आहे. तसेच लहानपानापासून मला त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत होते. त्यांनी केलेले कुशल कम्म आणि धम्माचे कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील असे म्हणत […]

बातम्या

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दीक्षा घेतलेल्या चार भिक्खुंपैकी हे एक होते

वर्धा : आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचे मंगळवारी (ता.४) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केळझर मधील धम्मराजिक महाविहार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलिसांनी बंदुकीच्या ३ फेरीने त्यांना मानवंदना दिली. भदंत धम्मसेवक […]

ब्लॉग

अजिंठ्याचा वारसा निजामांनी जपला…

आज जगप्रसिद्ध अजिंठा लेणी भारताच्या सांस्कृतिक-कला विभागातील अमूल्य रचना आणि ठेवा आहे. हा अमूल्य वारसा जपण्यासाठी तत्कालीन निजाम सरकारने जी कार्यतत्परता, जिज्ञासा आणि इच्छाशक्ति दर्शविली, त्यामुळेच हा अमूल्य ठेवा विश्वपटलावर विराजमान आहे. अजिंठा नगरीला सांस्कृतिक केंद्र बनविण्यासाठी निजाम सरकार ने खुप मोठे प्रयत्न केले. तेथील कलाकृतिला मुळ स्वरुपात आणून निजाम सरकार थांबले नाही, तर काळाच्या […]

इतिहास

वरळीचे जपानी बौद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबईत वरळी पोद्दार हॉस्पिटललसमोर एक जपानी बौद्ध विहार असून त्याचे नाव निप्पोन्झान म्योहोजी असे आहे. येथे गगनाला भिडणार्‍या इमारती उभ्या राहिल्या असून त्यांच्या गराड्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्धविहार लक्ष वेधून घेते. या विहाराच्या आवारात मोठमोठे वृक्ष असून उत्तराभिमुख असलेल्या या विहारातील सफेद संगमरवरी बुद्धमूर्तीचे दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होते. सन १९३१-३८ दरम्यान जपानी निचिरेन पंथाचे […]

ब्लॉग

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील आंबेडकरी जाणिवा

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सामाजिक बांधिलकेचे जाज्वल्य निशाण आहे. त्यांचे साहित्य मराठी साहित्य विश्वाचा अभिमान वाटावा असा भाग तर आहेच पण त्याहून अधिक ते भारतीय समाज संस्कृतीचे संचित आहे. एखाद्या लेखकाची साहित्य तेव्हाच संचित बनते जेव्हा लेखकाला समाजाबद्दल मूलभूत आस्था आणि अतूट असे प्रेम असते. समाज म्हणताना केवळ स्व:ताची जात असा त्याचा संकुचित […]