बातम्या

बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाकडून महामानवास अनोखी आदरांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला, बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाने एका अनोख्या तऱ्हेने आदरांजली वाहिली. जगामधे डॉ. बाबासाहेबांची ओळख एक उच्च विद्याविभूषित आणि विचारवंत व्यक्ती म्हणून होते. ट्रिबिल्सने आपल्या कार्यशाळे अंतर्गत आतापर्यंत कोणीही ‘न शिकलेली विद्या’ अशी ‘शिलालेखांचे ठसे’ म्हणजेच estampages आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवली. अगदी पुरातत्त्वाच्या विद्यार्थ्यांना देखील महत्प्रयासाने ही शिकता येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवस श्रद्धांजली अर्पण करून कार्यशाळेचे सुरुवात झाली.

Estampages शिकविण्या करीत ट्रिबिल्सने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण च्या Epigraphy विभागाचे माजी निर्देशक डॉ. टी. एस. रविशंकर यांना म्हैसूर वरून पाचारण केले होते. अतिशय तन्मयतेने सर्व विद्यार्थी ऐकत होते व विशेष म्हणजे सर्वांनी नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीं तील शिलालेखांचे ठसे घेतले. सकाळी 9 ते दुपारी 1.30 अशी ही कार्यशाळा चालली. खूप मजा आली.

लेणीं पाहायला आलेल्यांना देखील काही तरी नवं पाहायला मिळाले आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक नवीन विद्या शिकायला मिळाली. अगदी कागद भिजविण्यापासून (त्याचेही एक गणित आहे) तो शिलालेखांवर चिकटवणे ब्रशने विशिष्ठ प्रकारे ठोकणे, शाई लावणे, ड्याबर वापरणे, कागद काढणे व सुकवणे हे सर्व आमचे विद्यार्थी शिकले.

बाबासाहेब आयुष्यभर शिक्षा ग्रहण करीत होते व इतरांना देखील विद्यादान करीत होते. त्यांच्या या स्मृतिदिनी या पेक्षा वेगळी आदरांजली काय असू शकते?

ज्येष्ठ बौद्ध लेणी संशोधक आणि अभ्यासक अतुल भोसेकर सर यांच्या फेसबुक वॉलवरून….