ब्लॉग

वैज्ञानिक, महान विचारवंतांच्या दृष्टिकोनानुसार बुद्धधम्म एक वैज्ञानिक धर्म

बरेच वैज्ञानिक, महान विचारवंत आणि तत्त्वज्ञ धमप्रिती विरोधी दृष्टिकोन ठेवतात. ते म्हणतात की, धर्म मानवांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतो, हास्यास्पद व अंधश्रद्धाळू मान्यता आणि कर्मकांडाद्वारे धर्म माणसाला चुकीच्या मार्गाला घेऊन जातो आणि वैज्ञानिक तथ्यांपासून माणसाला दूर ठेवत असतो.

परंतु आपण जेव्हा त्यांनी मांडलेल्या धर्मविषयक व्याख्येचा विचार करतो तेव्हा आपण समजू शकतो की, बुद्धधम्म त्या धार्मिक समूहाशी संबंधित नाही. म्हणून, विचारवंतांच्या दृष्टिकोनानुसार, बुद्धधम्म एक वैज्ञानिक धर्म आहे आणि अंधश्रद्धेच्या आधारावर त्याला नाकारता येणे शक्य नाही.

याहीपुढे भगवान बुद्धांनी केवळ मानव निर्मित सत्यच कथन केले असे नाही, तर परम (आध्यात्मिक) सत्य सुद्धा कथन केले आहे. जर खरोखरच यात सत्य असेल तर ते नेहमीसाठीच सत्य म्हणून कायम राहील, जर सत्य विशिष्ट परिस्थितीत बदलत असेल तर त्याला खचितच परम-सत्य म्हणता येणार नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सत्याला श्रेष्ठ आर्य सत्य म्हटले गेले आहे ते सत्य माणसाला उदात्त (श्रेष्ठ) जीवनाकडे घेऊन जाणारे आहे. कोणत्याही बौद्धिक व वैज्ञानिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समर्थ असेल असा जीवन जगण्याचा श्रेष्ठ, सदाचरणाचा मार्ग येथे नेहमीच अस्तित्वात राहणार आहे.

या अर्थाने, भगवान बुद्धांचा संदेश कधीच डळमळीत होणार नाही. भगवान बुद्धांनी जे काही शिकविले आहे ते जेव्हा विचारवंत समजून घेतील तेव्हा ते या जीवनविषयक मार्गाचा धार्मिक चिन्हे (Labels) अस्तित्वात राहोत अथवा न राहोत, भगवान बुद्धांचा पूर्णत्वाकडे घेऊन जाणारा जीवनमार्ग (धम्म) मार्गदर्शक तत्त्व म्हणून कायम राहणार आहे. या शिकवणुकीची मूलभूत तत्त्वे सर्वच स्थानी आणि वेळेत लागू होणारी असल्यामुळे लोकांना त्यांत बदल करण्याची काहीच गरज पडणार नाही. खरोखरच आदर करतील.

One Reply to “वैज्ञानिक, महान विचारवंतांच्या दृष्टिकोनानुसार बुद्धधम्म एक वैज्ञानिक धर्म

  1. मला आपलं धम्म चक्र हा ऐप आवडला आहे.. खुप छान माहिती आपण आपल्या सहकाऱ्यांना देत आहेत.. धन्यवाद…

Comments are closed.