इतिहास

महाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर […]

ब्लॉग

२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी – थोटलाकोंडा, विसाखापट्टनम – प्रा.हरी नरके

देशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. थोटलकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे […]

इतिहास

“शाल्भञ्जिका शिल्प” नेमके कोणाचे?

भारतीय शिल्पकलेमध्ये अनेक उत्तमोत्तम शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. या शिल्पांचा अभ्यास जसा उत्साहपूर्ण असतो तसाच या शिल्पांचा इतिहासही रोचक असतो. भारतात शिल्पकलेचा जन्म हा बौद्ध संस्कृतीतून झाला हे निर्विवाद सत्य होय. बुद्ध लेणीं आणि त्यानंतरच्या अनेक स्थापत्यात भ. बुद्धांचा इतिहास किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. “शालभंजिका” हे असेच एक शिल्प होय. हे शिल्प […]

इतिहास

बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’

‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो याचे आश्चर्य वाटते. अशा या ‘पल्ली’ शब्दाचा उगम शोधला तर तो बौद्ध संस्कृतीतून आल्याचे स्पष्ट होते. नऊशे वर्षापूर्वी दक्षिण भारतात बौद्ध संस्कृती व बुद्धांची शिकवण जोपासणारी अनेक केंद्रे […]

इतिहास

सम्राट कनिष्काच्या काळातील ‘हा’ स्तूप पंजाबमधील बुद्ध धम्माची साक्ष देतो

पंजाबच्या फतेहगड साहिब जवळ संघोल एक छोटे गाव आहे. चंदीगड पासून ४० किमी अंतरावरील लुधियाना कडे जाणाऱ्या मार्गावर आणि ढोलेवाड या गावापासून १० किमी आत २०० किलोमीटर परिघात पसरलेल्या जागेला स्थानिक लोक उचा पिंड (उंच गाव) असेही म्हणतात कारण ते टेकडीवर आहे. संघोल गावात १९६८ साली पुरातत्व खात्याच्या उत्खनात सम्राट कनिष्काचा स्तूप आणि मध्य आशियातील […]

बुद्ध तत्वज्ञान

धम्म धारण करणे म्हणजेच बुद्ध उपदेशांना प्रज्ञेने पारखणे

मज्झिम निकाय या त्रिपिटकातील ग्रंथातील वत्थ सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश केला आहे की जर एखादे मळलेले, डागाळलेले वस्त्र असेल आणि रंगाऱ्याने त्याला घेऊन कोणत्याही रंगात ते बुडविले तरीही त्याच्यावर चांगला रंग चढणार नाही. ते डागाळलेलेच राहील. कारण काय तर वस्त्र मलिन असल्याकारणाने त्यावरती पाहिजे तो रंग चढणार नाही. त्याचप्रमाणे चित्त जर विकारांने मलिन असल्यास त्याच्यावर […]

ब्लॉग

दलित हिंदू नाही म्हणत ‘या’ अस्पृश्य नेत्याने १८९८ साली धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती

तामिळनाडूतील अस्पृश्य (पारियार) समाजातील अयोथीदासार (आययोथी थास, अयोध्यादास) यांनी १८९८ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन तामिळ मधील (वैदिक) धर्मांध लोकांना हादरा दिला होता. बौद्ध धम्मच आपला मूळ धर्म आहे, असा युक्तिवाद करून त्यांनी पारियार या अस्पृश्य जातीतील लोकांना बुद्ध धम्म स्वीकारण्यास सांगितले होते. अयोथीदासार यांनी फक्त धर्मांतरच केले नाहीतर मद्रास जवळ पेरंबुर येथे साऊथ इंडिया […]

बातम्या

थायलंडमध्ये माघपौर्णिमा उत्सव सुरू

थायलंडमध्ये आजपासून तीन दिवसांचा माघ पोर्णिमा पूजा उत्सव सुरू झाला. हा उत्सव ८ ते १० फेब्रुवारी असा तीन दिवस असून या निमित्त संपूर्ण थायलंडमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असून सर्व शासकीय कार्यालये आणि मद्यपान गृहे बंद राहणार आहेत. ही माघ महीन्याची पौर्णिमा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यादिवशी विहारातील भिक्खूंना खास करून भात शिजवून […]

बातम्या

स्पेनमध्ये उभारणार ४० मीटर उंचीची बुद्धमूर्ती; महाराष्ट्रापेक्षा छोटा देश करतोय सहकार्य

स्पॅनिश शहर कॅसेरस आणि लुंबिनी, नेपाळ यांच्या सहकार्याने मोठी ध्यानस्थ बुद्ध मूर्ती आणि विहार स्पेनमध्ये उभे राहत आहे. या बाबत नुकत्याच सामंजस्य करारावर सह्या झाल्या. तसेच माद्रिद फिटूर पर्यटन महोत्सवात २२ जानेवारी रोजी याबाबत प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. लुम्बिनी गार्डन फाउंडेशन यांच्यातर्फे निधी उभारण्यात येणार असून ध्यानस्थ बुद्ध मूर्तीची उंची जवळजवळ ४० मीटर उंच असणार […]

इतिहास

पिप्राहवा स्तुपातील अस्थींचे रहस्य

पिप्राहवा हे गाव उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थ नगर जिल्ह्यात आहे. लुंबिनी पासून हे ठिकाण बारा मैल अंतरावर आहे. या गावांमध्ये एक टेकडी होती. सन १८९८मध्ये ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांनी येथे उत्खनन केले. वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या विटांचे बांधकाम केलेला स्तुप आढळला. त्या स्तूपात काही मिळेल या अनुषंगाने त्यांनी तो खोदला असता […]