इतिहास

बनारस – मूळ बौद्ध संस्कृतीचे एक शहर : भाग २

सन १८६१-६२ मध्ये इंग्रज पुरातत्व संशोधकांनी बनारस मधील पुरातन स्थळांच्या शिलामुद्रण प्लेट तयार केल्या. त्याचबरोबर त्यावेळेला नुकत्याच शोध लागलेल्या डब्बा कॅमेऱ्याने पुरातन स्थळांचे फोटो घेण्यात आले. त्यामुळे बनारसची खरी ओळख कॅमेऱ्यात बंदिस्त झाली. मूळ बौद्ध संस्कृतीवर झालेल्या अतिक्रमणाचा मोठा पुरावा तयार झाला. यामुळे शोध निबंध सादर करताना तसेच पुरातत्त्व खात्याला अहवाल सादर करताना या फोटोंची जोड देण्यात आली. यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ठामपणे त्या स्थळाबाबत भाष्य करता येऊ लागले.

त्यावेळचे खाजगी फोटोग्राफर बोर्न आणि शेफर्ड यांनी काढलेले अनेक फोटो हे ब्रिटीश राजघराण्याशी संबंधित होते. The Royal photographic Album of Scenes and Personages हा त्यावेळच्या राजघराण्याशी संबधीत एक मोठा अल्बम होता.

वाराणसी जवळील सारनाथ येथील उत्खननाचे छायाचित्र

सन १८७६ च्या जानेवारीत प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ वेल्स यांचा भारतात दौरा झाला. त्यावेळी बनारस मधील ब्राम्हणांचे घाट, औरंगजेब मस्जिद तसेच इतर धार्मिक स्थळांचे अनेक फोटो बोर्न आणि शेफर्ड यांनी काढले. यामुळे प्राप्त झालेल्या या पुराव्यांच्या आधारावर अनेकांनी शोध निबंध लिहिले. बनारस मधील मूळ बौद्ध संस्कृतीवर केलेल्या अतिक्रमणांची छायाचित्रे पाहून इंग्लंडचा राजा (सातवा एडवर्ड ) नक्कीच हळहळला असेल. ब्रिटिश लायब्ररी येथील एशिया पॅसिफिक आणि आफ्रिका संग्रह या विभागातील बनारसच्या निगेटिव्ह क्र.११८७ सोबत एक अहवाल पुरातत्ववेत्त्यानी जोडला होता. त्यावर खालील प्रमाणे लिहिले होते.

Nevertheless, Benares is not of very ancient fame as a Hindu city. All its early religious celebrity is derived from Buddhism, which supplanted or overshadowed Brahmanism in the greater part of India for nearly a thousand years. No doubt Brahmanism obtained in the district of Benares, as elsewhere in India when Saky Muni (Buddha) began his preaching there; but there seems an entire absence of evidence ( whether of written record or the sometimes more trustworthy one of stone and brick ) that Benares enjoyed any religious pre-eminence in pre-Buddhist days. It was Buddhism, and the splendid colleges or monasteries belonging to that faith, which gave celebrity and sanctity to the district which Brahmanism inherited after the expulsion of the Buddhist.

हे पण वाचा : बनारस – मूळ बौद्ध संस्कृतीचे एक शहर : भाग १

म्हणजे मूळ बौद्ध स्थळांवर झालेले अतिक्रमण व चाललेला तिथला भोंगळ कारभार व कृत्ये पाहून पुरातत्व संशोधकालाही खंत वाटली. बौद्ध कालखंडापूर्वी काशीमध्ये कोणतेही धार्मिक कार्य होत नव्हते. भगवान बुद्ध यांच्या काळानंतर वाराणसीला महत्व आले. याबाबत १९ व्या शतकात ब्रिटिशांनी भारतीय पुरातत्व खात्यासाठी गोळा केलेले छायाचित्रांचे पुरावे हे मोठे दस्तऐवज ठरले आहेत. ब्रिटिशांच्या या संशोधक वृत्तीला सलाम. या फोटोग्राफिक रेकॉर्डने भारतीय पुरातत्व खात्याची मान निश्चितच उंचावलेली आहे. कारण त्याचमुळे खरी मूळ भारतीय संस्कृती दिसून येत आहे. आणि बहुजन समाजाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “बनारस – मूळ बौद्ध संस्कृतीचे एक शहर : भाग २

  1. आपने भगवान धुध्दजी के बारेमे बहोतही महत्वपूर्ण जानकारी दी. आपका तहेदिलसे शुक्रिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *