जगभरातील बुद्ध धम्म

अबूधाबीतील शेख झायेद रोडवर एक विशाल बोधिसत्वाचे शिल्प का आहे?

अबू धाबी मध्ये ‘लाउरे कला व संस्कृती’ नावाचे संग्रहालय आहे. तेथील हायवेवर जगातील विविध शिल्पाकृती विराजमान झाल्या असून त्या रस्त्यास हायवे गॅलरी म्हणतात.

प्रस्तुत शिल्प हे चीन मधील एका लाकडी बोधिसत्वाच्या मूर्तीची प्रतिकृती आहे. मूळ चिनी लाकडी शिल्प गौनियन बोधिसत्व यांचे असून ते सन १०५० ते ११५० या कालावधीत कोरलेले आहे. या उभारलेल्या प्रतिकृतीची संपूर्ण उंची १० मी. असून दुरुनही ते दृष्टिपथात येते.

2 Replies to “अबूधाबीतील शेख झायेद रोडवर एक विशाल बोधिसत्वाचे शिल्प का आहे?

  1. म्यानमार येथील महामुनी बुद्ध विहार जगातील अतिशय सुंदर विहार आहे.

Comments are closed.