इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०१ – मनकायला स्तूप

इस्लामाबाद येथील डॉन वृत्तपत्रात २१ जुलै २०१५ मध्ये मनकायला गावातील एका बौद्ध स्तुपाची माहिती प्रसिद्ध झाली. हे गाव रावळपिंडी पासून २७ कि.मी. अंतरावरील GT रोडवर आहे. (Grand Truck Road)तिसऱ्या शतकात बांधलेला हा स्तूप गावातील रावत बस स्टँडच्या मागे आहे.

पुरातत्व खात्याचे गफूर लोन यांनी सांगितले की हा स्तूप भारतीय सम्राट अशोक राजाने बांधला असून त्याचा विहार असलेला परिसर चार मैल आहे. या परिसरात अनेक पुरातन अवशेष अध्यापही जमिनीखाली गाडले गेलेले आहेत. दुर्दैवाने स्तूपाच्या आजूबाजूस वसाहती होत असून अतिक्रमणाचा धोका वाढत आहे. गफूर लोन यांनी पुढे माहिती दिली की या स्तुपात कोण्या मोठया बौद्ध भिक्खूंची रक्षापात्रे होती.

सन १८०८ मध्ये अफगाणिस्तान येथील ब्रिटिश राजदूत माउंटस्टुअर्ट एलफिन्स्टन याने हा स्तूप शोधला. ‘Kingdom of Caubul’ ( सन १८१५) या त्याच्या डायरीत त्याने या स्तुपाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर सन १८३० मध्ये जीन बाप्टिस्ट व्हेंचुरा नावाचा एक इटालियन प्रवासी येथे आला होता व तो पंजाब प्रांताचा राजा महाराज रणजित सिंग यांचेकडे कामाला होता. त्याने स्तूप खोदून आतले पवित्र अवशेष काढले, अशी नोंद मिळते. आज ते पवित्र अवशेष ब्रिटिश म्युझियम मध्ये आहेत. मात्र हा खोदलेला स्तुप सन १८९१ मध्ये दुरुस्त केला.

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०२ – तख्त इ बाही आणि सहर इ बेहलोल

पाकिस्तानात असे जवळजवळ ४०३ दुर्लक्षित असलेले स्तूप आहेत. त्यातील काही स्तुपांची माहिती पूढील भागात घेऊ.

-संजय सावंत. नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *