आंबेडकर Live

बाबासाहेबांच्या मध्यस्थीमुळे होळकर घराण्यातील राजपुत्राचा आंतरधर्मीय विवाह…

इंदूरचे महाराजाधिराज सर राजराजेश्वर सवाई श्री.तुकोजीराव तृतीय होळकर तेरावे बहादुर यांनी कु.मन्सी मिलर या अमेरिकन युवतीशी विवाह करण्याचे ठरविल्याने त्यांच्या विवाहास धनगर समाजाने विरोध केला. यावरून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीत या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी धनगर समाजाची एक परिषद ४ मार्च १९२८ रोजी भरली होती. या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांची बाजू उचलून धरली…आणि या […]

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात साईबाबांविषयी काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं? हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात शोधलं असता २४ जानेवारी १९५४ रोजी साईभक्त संमेलनाच्या उदघाटन समारंभातील एक भाषण उपलब्ध आहे. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. यासाठी ते वेगवेगळ्या देशांत, शहरांत गेले. तिथं […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांना ‘बायबल’ विषयी असलेले ज्ञान पाहून ख्रिश्चन धर्मगुरूला घाम फुटला…

१९३५ ला येवला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही.’ अशी घोर प्रतिज्ञा केली होती. त्यांनतर बाबासाहेबांच्या मागे सर्व धर्माचे धर्मगुरू आपला धर्म किती श्रेष्ठ आहे, असे सांगून आपल्या धर्माचा स्वीकार करावा अशी विनंती करू लागले. यामध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक सुद्धा बाबासाहेबांना आपल्या धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले होते. याबद्दल हा किस्सा वाचा… […]

आंबेडकर Live

बाबासाहेब आणि गाडगे महाराज यांच्यातील ऋणानुबंधा विषयी हे दोन किस्से वाचा!

घटना पहिली.. मुंबईच्या एका पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू होते. (बहुधा नरे पार्कातली सभा असावी.) लोक शांतपणे भाषण ऐकत होते. एवढ्यात खडखड करणाऱ्या गाडीचा आवाज आला. आवाज ऐकून बाबासाहेबानी भाषण थांबवले. लोकाना कळेना भाषण का थांबवले ते. बाबासाहेबांनी अचूक हेरलं होतं ते की कोण आलंय… ते होते, गाडगेबाबा… गाडगेबाबांच्या हातात हार होता. ते मंचाजवळ […]

आंबेडकर Live

औरंगाबाद व मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून बाबासाहेबांनी ‘या’ योजना आखलेल्या होत्या

औरंगाबाद ही आंबेडकरी चळवळीची कर्मभूमी. शहराला बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला आहे. महामानवाचा सहवास लाभलेला एक मोठा वर्ग आजही शहरात आहे. औरंगाबादबद्दल बाबासाहेबांना आकर्षण वाटत असे, विशेष म्हणजे बाबासाहेबांना त्याकाळी औरंगाबाद व मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून त्यांनी बऱ्याच योजना आखलेल्या होत्या. त्यासाठी ते प्रयत्नशीलही होते. या योजना वाचून तुम्हालाही बाबासाहेबांची दूरदृष्टीचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही सायन्स कॉलेजजवळील […]

आंबेडकर Live

स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अनमोल योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी केवळ अस्पृश्यांसाठी कार्य केले, हा काही लोकांनी त्यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठी राबवलेला अजंडा आहे. भारताचा सर्वांगिण विकास त्यांच्या सामाजिक विकासांच्या मागील मूळ हेतू आहे. जोपर्यंत देशात सामाजिक विकासाचे चक्र गतीमान होणार नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही. देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला गतीमान करणारे […]

आंबेडकर Live

संगीत प्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर : परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तन आणि बदलाची आमूलाग्र क्रांती केली. त्यासोबतच त्यांचं व्यक्तिमत्व हे विविधांगी आणि संपन्न व्यक्तिमत्त्व रसिक वृत्तीचं होतं. संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. भोवतालच्या व्यापातापाच्या गर्दीतून बाहेर निघून संगीत ऐकावे असे त्यांना वाटायचे. केवळ संगीत ऐकावे एवढीच त्यांची संगीताची आवड मर्यादित नव्हती तर आपल्याला गाता आले पाहिजे, वाजविता […]

आंबेडकर Live

२ डिसेंबर १९५६ : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दलाई लामा

२ डिसेंबर १९५६ वार रविवार नानकचंद सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, ”आलास वेळेवर…आज आपल्याला खूप काम करायाचे आहे” ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व कार्ल मार्क्सचे ‘दास कॅपिटल’ या ग्रंथातील संदर्भित मजकूर परत डोळ्यांखालून घालून ‘बुद्ध अँड कार्ल मार्क्स’ या आपल्या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. लिहिलेल्या मजकुराची […]

आंबेडकर Live

माऊलीची माया होता माझा भीमराया…!

१९४६ निवडणूक दौरा – ब.ह वराळेंनी डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकात सांगितलेला प्रसंग मिरजेला जेवणखाण झाल्यानंतर मला मुंबईला येण्याचा आदेश बाबासाहेबांनी दिला. मिरजेहून पुढे मला मुंबईस जावे लागेल याची मला कल्पना नव्हती. शिवाय दिवसभर मी प्रवासातच होतो. त्यामुळे अंथरुण-पांघरुण, कपडे वगैरे काहीच घेतले नव्हते. आमचा मुंबईचा प्रवास रेल्वेने सुरु झाला होता. वेळ रात्रीची होती, थंडीचेच दिवस […]

आंबेडकर Live

‘जाती’ सामाजिक जीवनात विषमता आणतात म्हणून भारतातील जाती राष्ट्रविरोधी

अमेरिका व भारत देशाची एकमेकांशी तुलना करीत बाबासाहेब बोलत होते. विश्वबंधुत्व व राष्ट्र यांची माहिती आपल्या भाषणात देत देत बाबासाहेब या संदर्भात ‘राष्ट्र व जात’ या मुद्याकडे वळले. त्याची छाननी करताना ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “अमेरिकेत जातींचा प्रश्न नाही. भारतात जाती आहेत. या जाती राष्ट्रविरोधी आहेत. जाती सामाजिक जीवनात विषमता आणतात. वेगवेगळेपणा आणतात म्हणून […]