ब्लॉग

भिक्खू ह्यूएन-त्संग यांच्या खडतर प्रवासावरील चित्रपट

चीन मधील पौराणिक साहित्यातून ‘पश्चिमेचा स्वर्ग’ म्हणजेच भारताबद्दल बरेच काही लिहून ठेवलेले आहे. चिनी लोकांना भारताबद्दल आदर वाटण्याचे एकमेव कारण म्हणजे हा देश शाक्यमुनी गौतम बुद्धांचा आहे. याच देशात त्यांचा जन्म झाला. येथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि येथेच मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी धम्मज्ञान दिले. इ.स.६७ पासून चीनमध्ये बौद्ध धम्माच्या प्रचाराचे काम सुरू झाले. तेव्हापासून धर्मप्रसारासाठी अनेक […]

ब्लॉग

महापरित्राण पाठ ; कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मन संतुलित राखणे आवश्यक

अलीकडचे वैद्यकीय शास्त्र मानते की बरेचसे ९० टक्के आजार हे मानसिक अवस्थेमुळे होतात. मनाची अवस्था जर सुदृढ असेल तर शारीरिक आजार होत नाहीत. मन खंबीर असेल तर शरीरात रोगराईला प्रतिबंध असणारी यंत्रणा कार्यरत होते. मात्र १० टक्के आजार हे बाहेरील वातावरणामुळे शरीरावर होतात. मन ज्याप्रमाणे शरीराला आजारी पाडते त्याचप्रमाणे ते शरीराला ठीक देखील करते. एखादा […]

ब्लॉग

यावर्षीची ‘भीमजयंती’ कशी साजरी करायची?

कालच्या ‘जनता कर्फ्यू’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ७६ वरुन १०० पर्यंत पोहचली आहे. पुढील एक महिना अतिशय क्रिटीकल आहे. आत्मघाताकडे जाणारा हा झुंडशाहीचा देश स्वत:ची कबर खोदण्यात लागलेला आहे. त्यासाठी रक्तपुरवठा, आरोग्य सेवांच्या बाबतीत आतापासून सतर्क राहून काम करणे अत्यावश्यक झाले आहे. पुढच्याच महिन्यात, १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती […]

ब्लॉग

भीमजयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट….आता जयंती साजरी कशी करायची?

सर्वांना जयभीम, नमो बुध्दाय… जगभरात कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. आता राज्यात सुद्धा काही कोरोनाचे संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सर्वांनी काळजी घ्यावी. राज्य सरकार सुद्धा कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची आवश्यक ती काळजी घेत आहे. अफवांना बळी पडू नका! भीमजयंती साजरी कशी करणार? बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठा संदेश दिलाय […]

ब्लॉग

व्हिएतनाम मधील बौद्ध धम्म

व्हिएतनाम देशात हनोई शहराजवळील समुद्रकाठी हेलॉंग बे नावाचा परिसर आहे. येथील समुद्रात असंख्य छोटे मोठे डोंगर आहेत. टेकड्या आहेत. आणि त्यातील बहुतेक टेकड्यांवर चढता येणे अशक्य असल्याने ती बेटे चित्रविचित्र वाटतात. तेथील एका डोंगरात निसर्ग निर्मित गुहा तयार झाल्या आहेत. जगभरातील पर्यटक त्या गुहा बघण्यात येतात. त्यामुळे या गुहा बघण्यासाठी तसेच व्हिएतनाम आणि कंबोडिया मधील […]

ब्लॉग

माणूस मोठा नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे

हातात काठी. डोक्यावर लाल पगडी. फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करून बुद्ध व्हा, शुद्ध व्हा! असे बाबासाहेबांचे विचार सांगणारा ६१ वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला; मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास २५ वर्षांपासूनचा आहे. सयाजी गायकवाड त्या व्यक्तीचे नाव. लातूर जिल्ह्यातील निलंगा या गावातून ते आले […]

ब्लॉग

२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी – थोटलाकोंडा, विसाखापट्टनम – प्रा.हरी नरके

देशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. थोटलकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे […]

ब्लॉग

दलित हिंदू नाही म्हणत ‘या’ अस्पृश्य नेत्याने १८९८ साली धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती

तामिळनाडूतील अस्पृश्य (पारियार) समाजातील अयोथीदासार (आययोथी थास, अयोध्यादास) यांनी १८९८ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन तामिळ मधील (वैदिक) धर्मांध लोकांना हादरा दिला होता. बौद्ध धम्मच आपला मूळ धर्म आहे, असा युक्तिवाद करून त्यांनी पारियार या अस्पृश्य जातीतील लोकांना बुद्ध धम्म स्वीकारण्यास सांगितले होते. अयोथीदासार यांनी फक्त धर्मांतरच केले नाहीतर मद्रास जवळ पेरंबुर येथे साऊथ इंडिया […]

ब्लॉग

बौद्ध भिक्खूंना लेण्यां दाखवा; त्यांनी पुढे येऊन लेण्यांबाबत मार्गदर्शन केले पाहिजे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महास्थविर संघरक्षित यांना ३ जुलै १९५० रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की ‘बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न यशस्वी व्हायचा असेल तर त्याची मोठी जबाबदारी भिक्खुंच्या खांद्यावर पडते. यापुर्वी होते त्यापेक्षाही त्यांना अधिक कार्यरत बनले पाहिजे. त्यांनी आपल्या गुहेतून बाहेर पडलेच पाहिजे आणि लढणाऱ्या शक्तींच्या आघाडीवर राहिले […]

ब्लॉग

“पांडव बौद्ध होते का?”

माझ्यासारख्या अनेक इतिहास आणि लेणींमध्ये रुची असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जगभरातल्या संशोधकांनी मान्य केले आहे कि पांडवांचे कुठलेही पुरातत्त्वीय अथवा ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही आणि जे काही साहित्यात उपलब्ध आहे ते “मिथक” या प्रकारात मोडते. मात्र तरीही समजा थोड्यावेळ आपण पांडव होऊन गेले असे गृहीत धरले, तर पांडव त्यांच्या वनवास काळात […]