बुद्ध तत्वज्ञान

एही पस्सीको – या पहा आणि मगच विश्वास ठेवा

बुद्धिझम तत्वप्रणाली सर्व जगभर पसरली आहे. तो एक धर्म म्हणून नाही तर दुःखमुक्त जीवन जगण्याचा उच्चतम मार्ग आहे. पाश्चात्य देशात लोकांनी धर्म न बदलता विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आहे. राग-द्वेष, मोह-माया पासून मुक्त होऊन निर्वाणपदी पोहोचलेले आणि सर्व मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या बुद्धांनी स्वतःसाठी काही वेगळे स्थान निर्माण केलेले नाही. राजपुत्र असताना पायाशी लोळणाऱ्या सुखांना […]

बुद्ध तत्वज्ञान

सम्यक दान : दान पारमितेला बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान

त्याग आणि सेवा भावनेने स्वतः जवळची वस्तू किंवा धन दुसऱ्याला देणे यालाच दान म्हणतात. मानवी जीवनात दानाचे फार महत्त्व आहे. शरीर, मन आणि वाणीने दुसऱ्यांच्या सुख-शांती करता केलेला त्याग म्हणजेच दान होय. दान अनेक प्रकारे दिले जाऊ शकते. आजारी माणसाची मदत करणे, शिकणाऱ्याला पुस्तक देणे, फाटकी वस्त्रे अंगावर घालणार्‍याला वस्त्राचे दान देणे, भुकेल्याला भोजनाचे दान […]

बुद्ध तत्वज्ञान

श्रेष्ठ भिक्खू ‘राष्ट्रपाल’ याची निस्पृहणीयता

भगवान बुद्ध कुरूराष्ट्रात प्रवास करीत असताना ‘थुल्लकोठीत’ नावाच्या शहरापाशी आले. तेथील रहिवासी त्यांची कीर्ती ऐकून ते सर्व त्यांच्या दर्शनाला गेले. नमस्कार करून, कुशल प्रश्न विचारून ते मुकाट्याने एका बाजूस बसले. त्यावेळी थुल्लकोठीतवासीयांना भगवान बुद्धांनी धर्मोपदेश केला. तेव्हा तरुण राष्ट्रपाल तिथे होता. त्याच्या मनावर त्या उपदेशांचा एकदम परिणाम झाला. बुद्धांप्रती अपार श्रद्धा दाटून आली. तेंव्हा त्याने […]

बुद्ध तत्वज्ञान

धम्म धारण करणे म्हणजेच बुद्ध उपदेशांना प्रज्ञेने पारखणे

मज्झिम निकाय या त्रिपिटकातील ग्रंथातील वत्थ सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश केला आहे की जर एखादे मळलेले, डागाळलेले वस्त्र असेल आणि रंगाऱ्याने त्याला घेऊन कोणत्याही रंगात ते बुडविले तरीही त्याच्यावर चांगला रंग चढणार नाही. ते डागाळलेलेच राहील. कारण काय तर वस्त्र मलिन असल्याकारणाने त्यावरती पाहिजे तो रंग चढणार नाही. त्याचप्रमाणे चित्त जर विकारांने मलिन असल्यास त्याच्यावर […]

बुद्ध तत्वज्ञान

आपण रागात असताना चढ्या आवाजातच का बोलतो? यावर भगवान बुद्ध म्हणाले…

एकदा तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, “आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?” सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो.” यावर गौतम बुद्ध म्हणाले, “पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती […]

बुद्ध तत्वज्ञान

भगवान बुद्धांनी प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे धम्म शिकविला

भगवान बुद्धांनी माणसा माणसांतील असा फरक जाणून प्रत्येक माणसाला धम्म शिकविण्याची वेगवेगळी पद्धत ठेवली होती. उदारणार्थ एखाद्या भुकेलेल्या, थकलेल्या पण धम्म शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या माणसाला, त्याला पोट भरून जेवण देऊन पुरेशी विश्रांती दिल्याशिवाय ते शिकवित नसत. एकदा एका शेतकऱ्याचा बैल हरवला होता. त्या बैलाला शोधत तो दिवसभर रानावनात न खाता-पिता फिरत होता. सायंकाळी तो परत […]

बुद्ध तत्वज्ञान

मज्झीम निकाय मधील ‘ककचूपम सुत्ताचे सार’ मनुष्य जातीस कायमस्वरूपी कल्याणकारी

त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक’ या मधील मज्झिम निकाय या विभागातील अनेक सुत्ते सुंदर उपदेशांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आढळतात. यातील उपदेश लोकांना समजेल असा असून कल्याणकारक आहे. या मज्झिम निकाय मधील ककचूपम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात….. “भिक्खुंनो, एखादा मनुष्य हातात कुदळ घेऊन येईल आणि म्हणेल ‘मी, या पृथ्वीचा नाश करीन’ असे बोलून तो इथे तिथे खोदू लागला, […]

बुद्ध तत्वज्ञान

अवकाशातील विश्वाबद्दल अडीज हजार वर्षांपूर्वीच भगवान बुद्धांनी सांगितले होते

आपली सूर्यमाला एका मोठया ‘मिल्की वे’ आकाशगंगेत आहे. अशा या आकाशगंगेत सुर्यासारखे लक्षावधी तारे आहेत. त्यातल्या हजारो ताऱ्याभोवती आपल्या सारखी ग्रहमाला असू शकेल.आणि अशा अनेक आकाशगंगा एका दीर्घिकेमध्ये आहेत. सध्या एकूण वीस दीर्घिकांचा कळप असल्याचे शास्त्रज्ञानां कळून आले असून अवकाशाचे हे कुरण वाढतच चालले आहे. हबल दुर्बिणीतून असंख्य गोष्टी उजेडात आल्या आहेत. यातील प्रत्येक दीर्घिके […]

बुद्ध तत्वज्ञान

किसा गौतमी : सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे

किसा गौतमीचा विवाह एका व्यापारी पुत्राशी झाला होता. विवाहानंतर ती पुत्रवती झाली. हिंड फिरू लागण्यापूर्वीच दुर्भाग्याने तिचा पुत्र सर्पदंशाने मृत्यू पावला. तिने पूर्वी कधीही मृत्यू पाहिला नव्हता., त्यामुळे आपला पुत्र मृत्यूस प्राप्त झाला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सर्पदंश झाल्यास्थानी दिसणारा लहानसा लाल डाग हा तिच्या पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला म्हणून आपल्या पुत्राचे […]

बुद्ध तत्वज्ञान

आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक

तथागताची देशना होती की, आत्मा नाही. तथागताची अशीही मान्यता होती की पुनर्जन्म आहे. बुद्ध परस्पर विसंगत अशा दोन सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे असे दोषारोपण करणारे काही कमी नव्हते. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा शक्य आहे. परंतु यात विसंगती नाही. आत्म्याचे अस्तित्व नसतानाही पुनर्जन्म शक्य आहे. आंब्याची कोय असते. ही कोय […]