जगभरातील बुद्ध धम्म

म्यानमारचे ‘मंडाले’ – एक बौद्ध संस्कृतीचे शहर

म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र […]

जगभरातील बुद्ध धम्म

‘या’ धरणामुळे जवळजवळ पन्नास हजार पुरातन बौद्धस्थळे बाधित होणार

सर्व जगभर व आपल्या भारतात देखील धरणामुळे हजारो पुरातन धार्मिक स्थळे बाधित झालेली आहेत. त्यातली प्रमुख म्हणजे गुजरातमधील मेश्वोे धरणामुळे ‘देव नी मोरी’ हे बौद्ध स्तुप असलेले पुरातन स्थळ बाधित झाले आहे. तर आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरणामुळे नागार्जुनकोंडा हे बौद्धस्थळ बाधित झाले आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या पाकिस्तान आणि चीन यांच्या डायमेर-भाशा या […]

जगभरातील बुद्ध धम्म

काहु-जो-दारो : २००० हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन बौद्ध शहर

काहु -जो -दारो एक प्राचीन बौद्ध शहर होते. हे बौद्ध शहर पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील मिरपूर खास येथे आहे. काहु जो दारो प्राचीन बौद्ध शहर ३२ एकर परिसरात (१२०,००० स्क्वेर मीटर) वसलेले आहे. येथील उत्खनना दरम्यान येथे भव्य बौद्ध स्तूप सापडले आहे. हे प्राचीन बौद्ध स्तूप साधारणपणे २,००० वर्षे प्राचीन आहे. कालांतराने काहु -जो -दारो […]

जगभरातील बुद्ध धम्म

कंबोडियातील अंगकोर वट : ऐतिहासिक वारसा लाभलेले भव्य धार्मिक बौद्धस्थळ

कंबोडिया हे व्हिएतनाम आणि थायलंड या देशांच्यामध्ये वसलेले एक बौद्धराष्ट्र आहे. १३ व्या शतकापासून थेरवादी बौद्धधम्म तेथे प्रचलित आहे. ५ व्या शतकापासून बुद्धीझमचे अस्तित्व तेथे होते हे अलीकडील उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. ७ व्या शतकानंतर धम्माचा प्रभाव भारताप्रमाणेच कमी होत गेला. तेथील राजांना हिंदू करण्यात पुरोहित वर्ग यशस्वी झाला. पण राजाचे मंत्री बौद्धच राहिले. इ.स. […]

जगभरातील बुद्ध धम्म

इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थचे घर होणार बौद्ध विहार

इंग्लंडचा शेक्सपियर, जर्मनीचा गटे व शिलर, तसेच रशियाचा पुष्किन या प्रतिभावंत साहित्यिकांमुळे त्या त्या देशातील लोकांचे जीवन पिढ्यान्पिढ्या व्यापून गेले आहे. विल्यम शेक्सपिअर यांच्याप्रमाणे विल्यम वर्डस्वर्थ या रोमँटिक आणि सौंदर्यवादी कवीचा दबदबा देखील इंग्रजी साहित्यात आहे. पाच भावंडात त्याचा नंबर दुसरा होता. वडील जॉन वर्डस्वर्थ मुलांना कविता शिकवीत, त्यामुळे त्यांच्यात कवितेची आवड निर्माण झाली. सन […]

जगभरातील बुद्ध धम्म

बौद्ध देशांत करोना व्हायरस गायब

सर्व जगाला कोरोना व्हायरसचा विळखा पडलेला आहे. जगातील १६ मिलियन ( १ मिलियन= १० लाख ) लोकांना त्याची लागण झालेली आहे. ६.५० लाख मृत्युमुखी पडलेले आहेत. असे असताना मेकॉगं डेल्टा भागातील देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव बिलकुल जाणवला नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.आग्नेय आशियातील मेकाँग नदी ही अशिया खंडातील सात नंबरची सर्वात लांब नदी आहे. […]

जगभरातील बुद्ध धम्म

जगातील सर्वात जास्त माणसांवर अधिराज्य करणारा बौद्ध सम्राट कुब्लाई खान

चंगीझ खान किंवा चंगेझ खान (इ.स. ११६२ – इ.स. १२२७) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी (खान […]

जगभरातील बुद्ध धम्म

लिओ टॉलस्टॉय – बुद्ध तत्वज्ञानाकडे झुकलेला विचारवंत

लिओ टॉलस्टॉय हे तरुणपणी जेंव्हा १९ वर्षाचे होते, तेव्हा काही आजारामुळे एकदा कझान इस्पितळात उपचार घेत होते. त्यावेळी तेथे चोरांनी मारहाण केल्यामुळे एका बौद्ध भिक्खूनां इस्पितळात दाखल करण्यात आले. चोराने चोरी केली आणि मारहाण केली पण भिक्खूंना चोराबद्दल दया वाटत होती. त्यांनी त्याला माफ केले होते. त्यामुळे लिओ टॉलस्टॉय यांना आश्चर्य वाटले. आणि तेव्हापासून लिओ […]

जगभरातील बुद्ध धम्म

व्हिएतनाम देश आणि तेथील बुद्धिझम

१) बहुतेक करून व्हिएतनामी जनता ही बौद्ध तत्वांचे पालन करते. कम्युनिस्ट राजवटीमध्ये सुद्धा येथे बौद्ध भिक्खुंचे महत्व अबाधित राहिले. व्हिएतनामी बुद्धिझम हा अनेक शाखांचे मिश्रण असलेला बुद्धिझम आहे. त्यातील काही ठळक बाबी या जापनीज झेन, चायनीज चॅन, तिबेटीयन बुद्धिझम आणि अमिताभ (Pure Land) बुद्धिझम प्रमाणे आहेत. त्यामुळे येथील बुद्धिझमवर महायान शाखेचा पगडा दिसतो. फक्त मेकाँग […]

जगभरातील बुद्ध धम्म

‘पोसन फेस्टिव्हल’ हा श्रीलंकन बौद्धांचा वार्षिक उत्सव; भारत आणि श्रीलंका संबंधाचा ऐतिहासिक दिवस

श्रीलंकेतील पोसन पोया या नावाने ओळखल्या जाणारा ‘पोसन फेस्टिव्हल’ हा इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माची ओळख झाली म्हणून साजरा केला जातो. जूनमध्ये पौर्णिमेच्या दिवशी ‘पोसन’ हा सण साजरा केला जातो. पोसन फेस्टिव्हलमध्ये मिहिंतले येथील खडकाचे शिखर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, कारण असे म्हटले जाते की, ते मिहिंताले येथे असलेल्या या ठिकाणी श्रीलंकेचा राजा देवानमपियातिस्सा यांना […]