लेणी

बुद्ध लेणीं ते पांडव लेणीं – एक प्रवास

भारतातील सर्वात प्राचीन वास्तू (एखाद दुसरा अपवाद वगळता) या येथील पाषाणात कोरलेल्या “बुद्ध लेणीं” आहेत. हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय सत्य आहे. सम्राट अशोकाने बाराबार आणि नागार्जुनी डोंगरात (आत्ताच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात) सर्वात पहिल्यांदा लेणीं कोरून दान दिली. त्यानंतर ही अतिशय अभिनव कला इतर प्रदेशात रुजू लागली. महाराष्ट्रात पाषाणाच्या प्रचंड मोठी डोंगरांची रांग या […]

लेणी

लेण्याद्रीचे मूळ नाव काय?

महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जाखीणवाडी बुद्ध लेणी (जाखीणवाडी हे […]

लेणी

लेण्यांचे नकाशे तयार करा..!

लेणी बघण्याची आवड समाजात निर्माण होत असून अनेक कुटुंब व ग्रुप तेथे बघण्यास, अभ्यास करण्यास व दीप लावण्यास जात असतात. पण बहुतेकांना त्या स्थानाची भौगोलिक माहिती ज्ञात नसते. अक्षांश व रेखांश काय आहे याची माहिती नसते. समुद्रसपाटीपासून त्या स्थळांची उंची किती हे माहीत नसते. यासाठी लेण्यांचा परिपूर्ण शास्त्रशुद्ध नकाशा जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपने तयार करणे गरजेचे […]

लेणी

तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’

महाराष्ट्रात लेण्यांचे भांडार आहे. व त्यांच्या ठिकाणावरून प्रत्येक लेण्यांची नावे वेगवेगळी आहेत. मात्र हरेक ठिकाणी त्याला स्थानिक लोक पांडव लेणी म्हणतात. आता महाभारतातील पांडव या सर्व लेण्यांच्या ठिकाणी कसे राहिले असतील या प्रश्नाचा कोणी विचार करीत नाही. लेण्यांमध्ये स्तुप आहे, शिल्पे कोरलेली आहेत, ब्राम्हीलिपीतील माहिती आहे, तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’ […]

लेणी

आंध्रप्रदेशातील बेलम गुहेत बौद्ध भिक्खू दीड-दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव्यास होते

आंध्रप्रदेश मध्ये १८८४ साली ब्रिटिश सर्वेअर रॉबर्ट ब्रूस फुट याने कुर्नूल जिल्ह्यामध्ये बेलम गावाजवळ डोंगराळ प्रदेशात एक गुहा शोधली. ही गुहा जवळ जवळ ३२२९ मीटर लांब आहे. त्यानंतर शंभर वर्षे या गुहेकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र १९८२ ते १९८४ मध्ये जर्मनी वरून गुहांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या ( Speleologist ) टीमने या गुहेचे संपुर्ण सर्वेक्षण […]

लेणी

आंध्रप्रदेशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी सापडली

आंध्रप्रदेशातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी हे ४ ऑगस्ट रोजी रविवारी हेरिटेज जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत सर्वेक्षण करत होते. विजयवाडापासून जवळच असलेल्या मोगलराजपूरम येथे सर्वेक्षण करत असताना धानमकोंडा टेकडीवर त्यांना कठीण खडकात कोरलेली इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी आढळली. सध्या सीसीव्हीए अंतर्गत आंध्रप्रदेशात पुरातन वारसा जतन […]

लेणी

कृष्णधवल फोटोग्राफीचा इतिहास आणि ब्रिटिशांनी भारतातील बौद्ध लेणींचे काढलेले फोटो

१) सन १८८५ मधील भाजे लेणी १८३९ साल हे प्रॅक्टिकल फोटोग्राफीचे जन्मवर्ष मानतात. कारण त्या साली नवीन शोधामुळे कॅमेराचा डब्बा (Box Camera) आटोपशीर झाला. कॅमेराचा एक्सपोजर मिनिटावरून सेकंदावर आला. नवीन केमिकल डेव्हलपर बाजारात आले. त्यामुळे फोटो प्लेट डेव्हलप करणे सुलभ झाले. १८६२ मध्ये चार्ल्स शेफर्ड याने भारतात सिमला येथे पहिला फोटो स्टुडिओ उभारला. १८६४ साली […]

लेणी

…तरच प्रत्यक्षात लेणीचे संवर्धन होईल!

मोबाईल स्मार्ट झाल्यापासून अनेक जण प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे यांना दिलेल्या भेटीचे छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोष्ट करू लागले आहेत. यामध्ये विविध लेण्यांचे उदा.कुडा लेणी, कान्हेरी लेणी, गंधारपाले लेणी, कोंढाणे लेणी यांचे पोष्ट केलेले माहितीपट निश्चितच चांगले आहेत. या सर्व लेण्यांच्या स्थळांचे दर्शन केले असता तसेच तरुण पिढीने बनविलेले माहितीपट पाहिले असता असे ध्यानात […]

लेणी

महाराष्ट्र लेण्यांबाबत उदासीन का?

बुद्धतत्वज्ञानाबद्दल जगभर कुतूहल वाढत असून बौद्ध स्थळे बघण्यास असंख्य पर्यटक भारतात येत आहेत. यासाठी केंद्र सरकारने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात आणि आंध्रप्रदेश राज्यात बुद्धिस्ट सर्किट योजने अंतर्गत ३६१.९७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्रात अगणित बौद्धस्थळें लेण्यांच्या स्वरुपात असून या बुद्धिस्ट सर्किट योजनेमध्ये महाराष्ट्राचे नाव बिलकूल नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. बौद्ध पुरातन स्थळाबाबतची […]

लेणी

कान्हेरी लेण्यांत सापडलेले ताम्रपट गेले कुठे?

डॉ. जेम्स बर्ड हे ब्रिटीश जमान्यात बॉम्बे एशियाटिक सोसायटीचे सन १८४७ पर्यंत उपाध्यक्ष व सचिव होते. व्यवसायाने ते डॉक्टर होते व १८१६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत असिस्टंट सर्जन म्हणून लागले. डॉक्टर असून त्यांना भारताच्या पुरातन बौद्ध संस्कृतीत खूप रस होता. त्यावेळी भारतात असंख्य बौद्धस्थळे उजेडात येत होती. यात लेण्या होत्या, स्तुप होते, अशोक स्तंभ होते, […]