इतिहास

महाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर […]

इतिहास

“शाल्भञ्जिका शिल्प” नेमके कोणाचे?

भारतीय शिल्पकलेमध्ये अनेक उत्तमोत्तम शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. या शिल्पांचा अभ्यास जसा उत्साहपूर्ण असतो तसाच या शिल्पांचा इतिहासही रोचक असतो. भारतात शिल्पकलेचा जन्म हा बौद्ध संस्कृतीतून झाला हे निर्विवाद सत्य होय. बुद्ध लेणीं आणि त्यानंतरच्या अनेक स्थापत्यात भ. बुद्धांचा इतिहास किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. “शालभंजिका” हे असेच एक शिल्प होय. हे शिल्प […]

इतिहास

बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’

‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो याचे आश्चर्य वाटते. अशा या ‘पल्ली’ शब्दाचा उगम शोधला तर तो बौद्ध संस्कृतीतून आल्याचे स्पष्ट होते. नऊशे वर्षापूर्वी दक्षिण भारतात बौद्ध संस्कृती व बुद्धांची शिकवण जोपासणारी अनेक केंद्रे […]

इतिहास

सम्राट कनिष्काच्या काळातील ‘हा’ स्तूप पंजाबमधील बुद्ध धम्माची साक्ष देतो

पंजाबच्या फतेहगड साहिब जवळ संघोल एक छोटे गाव आहे. चंदीगड पासून ४० किमी अंतरावरील लुधियाना कडे जाणाऱ्या मार्गावर आणि ढोलेवाड या गावापासून १० किमी आत २०० किलोमीटर परिघात पसरलेल्या जागेला स्थानिक लोक उचा पिंड (उंच गाव) असेही म्हणतात कारण ते टेकडीवर आहे. संघोल गावात १९६८ साली पुरातत्व खात्याच्या उत्खनात सम्राट कनिष्काचा स्तूप आणि मध्य आशियातील […]

इतिहास

पिप्राहवा स्तुपातील अस्थींचे रहस्य

पिप्राहवा हे गाव उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थ नगर जिल्ह्यात आहे. लुंबिनी पासून हे ठिकाण बारा मैल अंतरावर आहे. या गावांमध्ये एक टेकडी होती. सन १८९८मध्ये ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांनी येथे उत्खनन केले. वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या विटांचे बांधकाम केलेला स्तुप आढळला. त्या स्तूपात काही मिळेल या अनुषंगाने त्यांनी तो खोदला असता […]

इतिहास

भारतातील पिप्राहवा स्तुपातील बुद्ध अस्थींचा माहितीपट – Bones of the Buddha

‘Bones of the Buddha’ हा एक टीव्हीवरील माहितीपट असून तो २०१३ मध्ये आयकॉन फिल्मद्वारे नॅशनल जिओग्राफिक चॅनेल साठी फ्रान्समधून तयार करण्यात आला. यामध्ये पिप्राहवा स्तुपात आढळलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थिबाबतची माहिती आहे. १८९८ मध्ये जेव्हा भगवान बुद्धांच्या अस्थीं तेथील इस्टेटचे मालक विल्यम पेपे यांच्या जमिनीवरील स्तुपात सापडल्या तेव्हा नेहमी प्रमाणे कावेबाज लोकांनी गोंधळ घातला. त्याच्या सत्यतेबाबत […]

इतिहास

मध्य प्रदेश’ नव्हे ‘बुद्ध प्रदेश’

मध्यप्रदेश मध्ये एकूण ५२ जिल्हे आहेत. आणि हे ५२ जिल्हे १० मंडळात विभागले आहेत. यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सम्राट अशोककालीन स्तूप, चैत्य, विहार, संघाराम, शिलालेख आणि लेण्यां होत्या आणि आहेत. मात्र बाराव्या शतकातील परकीय आक्रमण, संपलेला राजाश्रय आणि पुरोहित वर्गाचा वरचढपणा यामुळे मध्य भारतातील बुद्धिझमला सुद्धा तडाखा बसला. तरीही आज मध्यप्रदेशातील बौद्ध स्थळांची यादी बघितली तर […]

इतिहास

‘माघ पूजा’ हा मूळ बौद्धसण आहे असे म्हटल्यावर तुम्ही चक्रावून जाल

माघपूजा सण म्हटल्यावर भारतातील बऱ्याच जणांना प्रयाग येथील गंगा-जमुना संगमावर माघ पौर्णिमेस होणारे स्नान आठवेल. कुंभमेळा आठवेल. गणेश पूजा आठवेल. पण हा मूळ बौद्धसण आहे असे म्हटल्यावर तुम्ही चक्रावून जाल. कपाळाला आठ्या पाडाल. पण सत्य हे आहे की या देशातील मूळ बौद्धसणांना पुरोहित वर्गाने काल्पनिक पुराणकथांचे लेबल लावले आहे. (वाचा Reader’s digest Feb.2019 ) आणि […]

इतिहास

आता कलिंग कठे आहे?

कलिंग हा एकेकाळचा प्राचीन प्रांत सद्यस्थितीत आंध्र प्रदेश,ओरिसा आणि छत्तीसगड राज्यात विभागला गेला आहे. इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात युद्ध झाल्यावर तो भाग मौर्य राजवटीच्या अंतर्गत आला. कलिंग म्हणजे भारताच्या पूर्वेकडील किनारी प्रदेश होय. महानदी व गोदावरी नद्यांच्या मधील व महेंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेली ती मोठी नगरी होती असा पुरातन साहित्यात उल्लेख आहे. आताच्या ओरिसामधील गंजम […]

इतिहास

सम्राट अशोकाने तक्षशिला येथे बांधलेल्या महान ‘धर्मराजिका’ स्तूपाचा इतिहास

धर्मराजिका स्तूप ज्याला तक्षशिलाचा महान स्तूप देखील म्हटले जाते, इ.स.पू. ३ ऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या अस्थींचे जतन करण्यासाठी हा स्तूप बांधला होता. पुढील शतकांमध्ये या स्तूपाला आणखी मजबूती देण्यात आली आणि त्यासाठी मूळ बांधकामाच्या भोवताली लहान लहान गोलाकार स्तूप बांधले गेले आणि इतरही काही बांधकामे केली गेली. इंडो-ग्रीक राजा दुसरा झॉयलस यांच्या […]