इतिहास

महायान पंथाच्या जपमाळेचे महत्व; या जपमाळेत १०८ मणी का असतात?

भगवान बुद्धांच्या काळानंतर तर्कशास्त्र व वास्तवता यांचा उदय झाला. प्रज्ञेच्या दृष्टीने विकास होत गेला. नैतिक विचारांना स्थान मिळू लागले. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीमुळे दुःख मुक्तीच्या मार्गाचे, सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. आंतरिक शांती ही मन विकारमुक्त केल्यानेच लाभते आणि ती ध्यानसाधनेमुळेच प्राप्त होते हे उमगले. मात्र ही स्थिती कायम राहिली नाही. संघामध्ये फूट पडली. सम्राट […]

इतिहास

वैश्य टेकडी स्तूप हा सम्राट अशोक, पत्नी विदिशादेवी, पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांच्याशी संबंधित

भगवान बुद्धांच्या काळातच धम्माचा प्रसार सर्व भारतभर झाला होता. मध्यप्रदेश यास अपवाद नव्हता. भगवान बुद्धांच्या काळानंतर अनेक स्तूप मध्यभारतात उभारले गेले. सम्राट अशोक जेंव्हा वयाच्या १९ व्या वर्षी उज्जयनी प्रांताचे (अवंती) प्रमुख झाले तेंव्हा त्यांची ओळख तेथील एका व्यापाऱ्याची मुलगी ‘देवी’ वय वर्षे १५ हिच्याशी झाली. तिच्याबरोबर विवाह संपन्न झाल्यावर पुत्र महेंद्र यांचा जन्म उज्जैनमध्ये […]

इतिहास

शूटिंगच्यावेळी मामुट्टीला बाबासाहेबांच्या वेशात पाहून लोकं चरणाला स्पर्श करून वंदन करायचे

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता मामुट्टी यांनी २१ वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सशक्तपणे भूमिका उभी केली होती. शूटिंगदरम्यान ते जेव्हा बाबासाहेबांसारखा पोशाख परिधान करायचे तेव्हा शेकडो लोक त्यांच्या चरणरजाला स्पर्श करून मनोभावे वंदन करायचे. पडद्यावर ज्ञानसूर्याचे मूर्तिमंत दर्शन घडवून त्यांनी व्यक्तिरेखेचे सोने केले. मामुट्टी वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण केले आहेत त्यानिमित्ताने… सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेता मामुट्टी यांचा […]

इतिहास

युआंग श्वांगची जगप्रसिद्ध स्मारके; बौद्ध संस्कृती आणि भारत-चीनच्या मैत्रीचे प्रतीक

बुद्ध तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या युआंग श्वांग भिक्खूने बुद्धाच्या जगभर जीवनप्रवासाचा मागोवा घेत ‘भारत यात्रा’ या अनमोल ग्रंथाची रचना केली अन् बुद्धाच्या पवित्र पावन स्थळांची सखोल संस्मरणीय माहिती बुद्धधर्मीयांसाठी संकलित केली. त्याची स्मारके नुसती पर्यटन स्थळे नसून भारत-चीन यांच्या प्रगाढ मैत्रीचे प्रतीक आहेत. भारतीय बौद्ध संस्कृती आणि सभ्यतेचा जणू तो आरसा आहे. तांग वंशाच्या उदयासोबतच चीनी […]

इतिहास

१९५७ साली प्रेमाचा संदेश देणारा चित्रपट ‘गौतम द बुद्धा’ नेहरूंच्या प्रोत्साहनाने भारतीयांसमोर आला

तथागत बुद्धांचा २५०० वा जयंतीसोहळा भारत सरकारने मोठ्या उत्साहाने साजरा केला. ‘गौतम द बुद्धा’ या चित्रपटाच्या माध्यमातून बुद्धाचे कलात्मक सादरीकरण समस्त भारतीयांना घडविले. ‘गौतम द बुद्धा’ या चित्रपटावर ओझरते दर्शन… नागपूरच्या ऐतिहासिक १४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षाविधीनंतर अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत महाकारुणिक बुद्धाच्या जीवन दर्शनावर आधारित कलात्मक ‘गौतम द बुद्धा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. […]

इतिहास

नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशभरातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. आज नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठा स्तूप उभा असून तो स्तूप देशातील सर्व बौद्धांचे उर्जास्थान बनले आहे. धर्मांतर सोहळ्याला ६५ […]

इतिहास

‘मोहोंजो-दरो’ सिंधू संस्कृती म्हणून ढोल बडविण्यात आले, पण इथे प्राचीन बौद्धस्थळे

सिंधू संस्कृतीचे शहर म्हणून ‘मोहों-न्जो-दरो’ या पुरातन स्थळाचा अभ्यास लहानपणी आपण सर्वांनी शाळेत असताना केला. तेथील वास्तुरचना, नगररचना, सांडपाण्याची यंत्रणा आणि सापडलेल्या छोट्यामोठ्या टेराकोटा शिल्पाकृती (नर्तकी, अलंकारित स्त्री, मणी-माळा, आभूषणे, प्राणी इत्यादी) हे सर्व अप्रतिम होते. इ.स.पूर्व हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या सुनियोजित शहराचा जगभर गवगवा करण्यात आला. इथली प्राचीन संस्कृती ही सिंधू संस्कृती म्हणून […]

इतिहास

अग्रश्रावक सारिपुत्त यांचा लहान बंधू रेवत

भगवान बुद्धांचे अग्रश्रावक सारिपुत्त यांच्या कुटुंबाची माहिती ‘खदिरवनिय रेवत’ या सुत्तात मिळते. सारिपुत्त हे सर्व भावंडात वडील बंधू होते. त्यांच्या बहिणींची नांवे चाला, उपचाला आणि सिसुपचाला अशी होती आणि भावांची नांवे चुंद,उपासेन व रेवत अशी होती. ही सर्व नांवे थेरीगाथेच्या अठ्ठकथेत सापडतात. रेवत हा सर्वात लहान होता. वडील बंधू सारखा तो भिक्खू होऊ नये म्हणून […]

इतिहास

सिद्धार्थ गौतम यांनी ज्या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर प्राशन केली ती ‘रत्नागिरी शिळा’ सापडली

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक) २०१८ च्या सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान टाइम्सच्या पाटणा आवृत्तीत एक बातमी आली की बोधगया क्षेत्रात धर्मारण्य आणि मातंगवापी जवळ एक मोठी शिळा सापडली आहे. या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थ गौतम यांनी ग्रहण केली होती. तसेच बुद्धांनी ज्ञानप्राप्ती पुर्वी जेथे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला ते मोहना […]

इतिहास

स्वतःला प्रजेचा सेवक मानणारा राजा – प्रियदर्शी राजा सम्राट अशोक

अशोकाची राजसत्तेविषयीची दृष्टीही अशीच विलोभनीय आणि असामान्य आहे. काळाची चौकट भेदून जाणारी अशी आहे. प्राचीन काळातले जगातले सारेच राजे स्वतःला प्रजेचे मालक समजत. तारणहार मानीत. राजसत्ता हे उपभोगाचं साधन मानलं जाई. राजसत्ता भोगण्यासाठीच असते. असाच जगातल्या साऱ्या राजाचा समज असे. सम्राट अशोक हा एकमेव अपवाद होता. तो स्वतःला प्रजेचा सेवक मानीत असे. राजसत्ता हे सेवेचं […]