बातम्या

कोरोना व्हायरस आणि बौद्ध जगत

कोरोना व्हायरसमुळे बौद्ध जगतात काय काय घडामोडी गेल्या दहा दिवसात झाल्या त्याची ही माहिती. १) मे महिन्यात थायलंडमध्ये होणारा संयुक्त राष्ट्र परिषदेचा १७ वा वैशाख दिवस समारंभ रद्द करण्यात आला आहे. थाई संघ वरिष्ठ परिषदेने याबाबत पत्रक जारी केले आहे. या अगोदर ११ वेळा हा समारंभ थायलंडमध्ये झाला होता व मागच्या वर्षी तो व्हिएतनाम मध्ये […]

बातम्या

नेपाळमधील सम्यक महादान महोत्सव; दर बारा वर्षांनी भरतो

पाटण येथे नुकताच ‘सम्यक महादान’ हा महोत्सव २६ व २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. मात्र हे ‘पाटण’ सातारा जिल्ह्यातील नसून ते नेपाळमधील आहे. त्याला ‘पटण’ असे देखील म्हणतात तसेच त्याचे दुसरे नाव ‘ललितपुर’ असे सुद्धा आहे. या महोत्सवात दिपंकर बुद्ध यांच्या प्रथम प्रतिमा तयार करून पूजल्या जातात. येथे असे मानले जाते की […]

बातम्या

थायलंडमध्ये माघपौर्णिमा उत्सव सुरू

थायलंडमध्ये आजपासून तीन दिवसांचा माघ पोर्णिमा पूजा उत्सव सुरू झाला. हा उत्सव ८ ते १० फेब्रुवारी असा तीन दिवस असून या निमित्त संपूर्ण थायलंडमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असून सर्व शासकीय कार्यालये आणि मद्यपान गृहे बंद राहणार आहेत. ही माघ महीन्याची पौर्णिमा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यादिवशी विहारातील भिक्खूंना खास करून भात शिजवून […]

बातम्या

स्पेनमध्ये उभारणार ४० मीटर उंचीची बुद्धमूर्ती; महाराष्ट्रापेक्षा छोटा देश करतोय सहकार्य

स्पॅनिश शहर कॅसेरस आणि लुंबिनी, नेपाळ यांच्या सहकार्याने मोठी ध्यानस्थ बुद्ध मूर्ती आणि विहार स्पेनमध्ये उभे राहत आहे. या बाबत नुकत्याच सामंजस्य करारावर सह्या झाल्या. तसेच माद्रिद फिटूर पर्यटन महोत्सवात २२ जानेवारी रोजी याबाबत प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. लुम्बिनी गार्डन फाउंडेशन यांच्यातर्फे निधी उभारण्यात येणार असून ध्यानस्थ बुद्ध मूर्तीची उंची जवळजवळ ४० मीटर उंच असणार […]

बातम्या

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक युवतीसाठी १८ जानेवारीला मोफत उद्योजकता कार्यशाळा 

पनवेल तालुक्यातील कामोठे येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक युवतीसाठी शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता, प्लॉट नं २, विक्रम टॉवर, हॉल ०१, सेक्टर १०, कामोठे, (नवीमुंबई) येथे मोफत एक दिवसीय उद्योजकता कार्यशाळा कार्यक्रम होणार आहे या कार्यशाळेत जे लाभार्थी हजर असतील त्यांच्यातील लाभार्थीची मुलाखतीद्वारे निवड करून त्यांना दोन महिने मोफत-उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमास […]

बातम्या

हरियाणात जाहीरपणे पहिल्यांदाच बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला

मुंबई : भन्ते अयूपाल यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून हरियाणा मध्ये पहिल्यांदाच बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला असल्याची माहिती दिली आहे. भन्ते अयूपाल यांच्या हस्तेच हरियाणातील पहिला बौद्ध विवाह संपन्न झाला आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की,आपल्या सर्वांसाठी एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद धम्म वार्ता. साधारणतः हरियाणातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायांसह मागील तीन वर्षांपासून […]

बातम्या

बौद्ध शिल्प गहाळ झाल्यास येथे नोंद करा

बिहारमध्ये ठिकठिकाणी गावोगावी बुद्धांची अगणित शिल्पे सापडत आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे अनेक शिल्पांची नोंद नसल्यामुळे त्यांच्या चोऱ्या होत आहेत. अशा बुद्धमूर्तींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे या टोळ्या स्थानिक चोरांना हाताशी धरून मूर्त्यांची चोरी करतात. आणि यामध्ये काही देशद्रोही गावकरी सुद्धा सामील असतात. बिहारमध्ये डिसेंबर २०१४ मध्ये नालंदाजवळ दिपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रणबिघा गावांमध्ये एकेदिवशी सकाळी […]

बातम्या

तुमची लेणी बघायला कुत्र पण येत नाही…माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

जुन्नर : जुन्नर तालुक्यात भारतातील सर्वात जास्त लेणी असून हा वैभवशाली ऐतिहासिक वारसा जुन्नरला लाभला आहे. अनेक देश विदेशातील अभ्यासक,पर्यटक लेणी पाहण्यासाठी येत असतात.लेणीवर जाण्यासाठी योग्य मार्ग नसतानाही ते येथे येतात. मात्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘तुमची लेणी बघायला कुत्रही येत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य करून बौद्ध लेणी अभ्यासक, संशोधक आणि लेणी प्रेमींचा […]

बातम्या

UNESCO ला सारनाथचा प्रस्ताव सादर; जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणार?

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सारनाथ मंडळाने सारनाथ या महत्त्वाच्या बौद्ध ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा याबाबतचा प्रस्ताव नुकताच युनेस्कोला सादर केला. तो जर मान्य झाला तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सारनाथचे नाव येईल. वाराणसी पासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थळ बौद्ध जगतात अत्यंत पवित्र मानले गेले आहे. ज्ञानप्राप्ती नंतर भगवान बुद्ध […]

बातम्या

गौतम बुद्ध इंटरनॅशनल एअरपोर्ट ‘या’ देशात होणार सुरू

हा लुंबिनी स्थळाजवळचा एअरपोर्ट पुढील वर्षी एप्रिलमध्ये चालू होत आहे. नेपाळमध्ये ‘त्रिभुवन’ हा एकच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लुंबिनी येथील विमानतळ छोटा होता व मोठी विमाने तेथे ऊतरु शकत नव्हती. यास्तव त्रिभुवनला सहाय्य म्हणून ‘गौतम बुद्ध इंटरनॅशनल एअरपोर्ट’ ( GBIA) हा आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन जागी बांधण्याचा निर्णय होऊन सन २०१५ मध्ये कामास सुरवात देखील झाली. व […]