ब्लॉग

स्वतःला अपत्य होऊ न द्यायचा निर्णय घेऊन गरजू मुलांवर खर्च करण्याचा डॉ.हर्षदीप कांबळे यांचा निर्धार

महाराष्ट्रातील ज्येष्ट सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे हे आपल्या प्रशासकीय कर्तबगारीमुळे व विविध सामाजिक उपक्रमामुळे सर्व परिचित आहेत. त्यांनी राज्याच्या विविध विभागात महत्त्वाच्या पदावर कौतुकास्पद काम केले आहे. समाजातील शेवटच्या माणसाला आपल्या ज्ञानाच्या व कौशल्याच्या जोरावर अधिकाधिक लाभ कसा मिळवून देता येईल या साठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यातही तरुणा मध्ये त्यांच्या विविध सर्जनशील कामामुळे ते फार लोकप्रिय आहेत.

डॉ कांबळे हे यवतमाळ इथे कलेक्टर, (शेतकरी पॅकेज, आदिवासी विकास इत्यादी) औरंगाबाद येथे लोकप्रिय मनपा आयुक्त, अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त (हृदयाला लागणाऱ्या स्टेंटच्या किमती कमी केले, मॅग्गीवर कारवाई आदी.) आणि आज राज्याच्या उद्योग विभागाचे आयुक्त म्हणून काम करताना सरकारच्या प्रचंड मोठ्या लवाजम्यात असलेला उद्योग विभाग गेल्या तीनेक वर्षात नवनव्या योजनांनी, त्यांच्या उद्योग धोरणांनी (मुख्यमंत्री रोजगार योजनेचे जनक, महिला धोरण इत्यादी) तरुणांनी उद्योजक बनावे ह्या योजना मुळे, चर्चेत आला आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काल डॉ कांबळे यांची एक मुलाखत जेष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर (मॅक्स महाराष्ट्र) यांनी घेतलेली पाहिली.आणि लॉकडाऊन मध्ये मरगळलेल्या मनात प्रकाशाचा झोत टाकून गेला. एका बाजुला संकटाच्या कुशीत लपलेल्या व्यवसायाच्या संधी दिसल्या तर दुसरीकडे ‘मी’पणातून बाहेर येण्यासाठी,जगातले सारे काही आपल्याच खिशात असावे या लोभी विचारापासून दूर जाण्याची शिकवण या मुलाखतीतून मिळाली. पण ह्या पेक्षा डॉ.कांबळे सरांच्या पर्सनल लाईफ बद्दलच्या आश्चर्यचकित करणाऱ्या आणि मनाला भारावून टाकणाऱ्या गोष्टीही समजल्या.

रवींद्र आंबेकरांनी, त्यांना ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विचारले की नेमकी त्यांची पत्नी, जी थायलंडची रहिवाशी आहे त्यांची भेट कशी झाली आणि लग्न कसे झाले?

त्यावर उत्तर देताना डॉ कांबळे म्हणाले की, तसे मी वाढदिवस साजरा करीत नाही तरी आपल्या तसेच हजारो लोकांच्या शुभेच्छा आल्या आहेत त्यांचे खूप धन्यवाद देतो.माझ्यावर लहानापासून माझ्या आईने लोकांची सेवा करण्याचे तसेच धम्माचे संस्कार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझ्यात रुजवले आहेत. मी प्रशासकीय कामासोबतच धम्माचे कामही करीत असतो. माझी पत्नी ही थायलंडची रहिवाशी असून ती स्वतःच्या बिझनेसचा मोठा पसारा सांभाळून बऱ्याच वर्षापासून तथागत बुद्धाच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार वेगवेगळ्या देश्यामध्ये करीत आहे. त्या थायलंड इथल्या प्रसिद्ध भन्तेजींच्या (ज्यांना थायलंडच्या राजघराण्याच्या कार्यक्रमाला ही बोलावले जाते, असे ते जेष्ट भिक्खू आहेत) सेक्रेटरी म्हणून काम पाहत असत.. आमची पहिली भेट नऊ (09) वर्षांपूर्वी धम्माच्या कामानिम्मित बोधगया इथे झाली. मी मग त्यांना भारतामध्ये वेगवेगळ्या कार्यामध्ये मदत करायला सुरु केली आणि हळूहळू ह्या मैत्रीचे पुढे प्रेमात कसे रूपांतर झाले, हे मलाच कळले नाही. कारण फार व्यस्त नोकरी आणि सामाजिक कामही खूप, त्यामुळे लग्न खरंच करायचे का? हा विचार मला नेहमी यायचा.

डॉ.हर्षदीप कांबळे सर आणि रोजाना व्हॅनिच कांबळे मॅडम

माझी पत्नी पण बिझनेस आणि धम्म कार्यामध्ये खूपच व्यस्त असल्यामुळे तिनेही कधी लग्नाचा विचार केला नाही. पण नंतर मात्र मीच त्यांना सांगितले की मी एक IAS अधिकारी आहे आणि सामाजिक कामही करतो त्यामुळे आपण निर्णय घ्यायला पाहिजे. खूप वेळ घेऊन त्यांनी हो म्हटले.. आणि असे आम्ही दोघे, वेगवेगळ्या देशातील, ज्यांनी लग्नाचा विचार कधी केला नव्हता ते एकत्र आलो. हे सर्व आम्ही धम्मा मध्ये काम करीत आहोत त्यामुळेच घडले आहे आणि बुद्धांच्या प्रतीत्यसमुत्पाद या सिद्धांतानुसार प्रत्येक गोष्टीला कारण असते असेच आम्ही मानतो. ह्यातून म्हणूनच लोकूत्तरा भिक्खू ट्रेनींग सेंटर आम्ही बांधून भिक्खू संघाला दान देऊ शकलो.

हे पण वाचा : आधुनिक राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यदान करणारा अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे

ह्यानंतर रवींद्र आंबेकर ह्यांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही तरुणांसाठी खूप काही करता,अनेक मुलांना शिक्षणाकरिता दत्तक घेतले आहे, तर तुमच्या स्वतःच्या मुलांचे काय??

ह्यावर डॉ. कांबळे ह्यांच्या चेहऱ्यावर धीरगंभीर भाव उमटले, काही वेळ निशब्द बसले, त्यांच्या डोळ्यात मात्र ओलावा वाटत होता..आणि त्यांनी या प्रश्नाला दिलेले उत्तर ऐकून काही वेळ धक्काच बसला.आपण जे ऐकतोय ते खरं वाटेना म्हणून पुन्हा पुन्हा तोच प्रश्न उत्तराचा संवाद 4 वेळा ऐकला.

डॉ.कांबळे ह्या प्रश्नावर म्हणाले, ” आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की स्वतःला एकही अपत्य होऊ द्यायचे नाही. तर समाजातीलच गरजू मुलांनाच मदत करायची आणि घडवायचे असा निर्धार केला आहे.”

औरंगाबाद येथील लोकूत्तरा भिक्खू ट्रेनींग सेंटर समोर डॉ.हर्षदीप कांबळे सर आणि रोजाना व्हॅनिच कांबळे मॅडम

ह्यावर आपण काय ऐकत आहोत, स्वप्नात तर नाही ना असे क्षणभर वाटायला लागले. पण कांबळे सर मुळीच खोटे बोलत नाहीत हे माहीत होते. आणि आम्ही पुढे ऐकायला लागलो…सर बोलताना म्हणाले” मी जिथे ही जातो तिथे खूप सारे मुले माझ्यासोबत काम करीत असतात. त्यातील काही मुले खूप हलाखीच्या परिस्थितीत आहेत. त्यांना आम्ही मदत करतो. हे करीत असताना एक जाणवायला लागले की युवकांसाठी काम करायचे असेल तर आपल्या गरजा कमी करायला हव्या. तसेच जास्त काम करायचे असेल तर आपल्यावरील जबाबदाऱ्या सुद्धा कमी करायला पाहिजे. आणि आपण स्वतः तथागतांनी सांगितल्याप्रमाणे मोहापासून दूर असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार करून त्यावर होणारे परिणाम हे सुद्धा लक्षात घेऊन आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की स्वतःला एकही अपत्य होऊ दयायचे नाही. समाजातील गरजू, गरीब मुलांनाच मदत करायची, त्यांनाच घडवायचे आणि मोठे करायचे. असा आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक धोरणाला नवं रूप देणारे आयुक्त

ह्यापुढे आमची जी साधन संपत्ती आहे ती गरजू, गरीब मुलांवरच खर्च करणार असा निर्धार केला आहे. हेच आमचे कुशल कम्म समजतो. तसेच हीच आमची मुलं मानून आम्ही त्यांना पुढे आणायचे ठरविले आहे. ह्या मुलांपासून आम्हाला खूप प्रेम मिळते, नेहमी ही तरुण मुले दिवस रात्र काम करण्यासाठी तयार असतात, त्यामुळे आमच्या स्वतःच्या अपत्यामध्ये गुंतून राहायायचे नाही असे खूप विचाराअंती ठरवले आहे.

डॉ कांबळे सरांचे हे बोलणे ऐकून डोळ्यातून अश्रू यायला लागलेत. असा कुणी माणूस, ह्या पृथ्वीतलावर आजच्या जगात राहू शकतो ह्यावर विश्वासच बसत नव्हता. पण डोळ्यासमोर हेच सत्य दिसत होते. आणि त्या भरलेल्या डोळ्यांनी ह्या असीम त्यागाच्या मूर्तीला त्यांच्या उदात्त विचारांच्या उंचीचे दर्शन घेण्यासाठी मान वर करून पाहण्याचा प्रयत्न केला.सूर्याकडे पाहताना जशी डोक्यावरची टोपी खाली पडावी पण त्याच्या तेजस्वी प्रकाशकिरणांनी त्याचे देखणे रूप न पाहता यावे असेच काहीसे डॉ कांबळे यांच्या उत्तराने झाले आहे. ५० व्या वाढदिवसानिम्मित खूप गाजावाजा करणारे कार्यक्रम आपण करतो.. पण डॉ कांबळे यांनी हा घेतलेला महान निर्णय या देशातल्या समतेचा, माणूसपणाचा, बुद्धाच्या प्रज्ञेचा, करुणेचा, इतरांप्रति प्रेमभावाचा ओलावा जिवंत असल्याचा दाखला दिला आहे. ह्यावरून त्यांची उच्च कोटीची दान पारमिता दिसून येते.

आदरणीय दलाई लामा यांच्या सोबत डॉ.हर्षदीप कांबळे सर आणि रोजाना व्हॅनिच कांबळे मॅडम

समाजातील इतर मुलं आपलीच आहेत त्यांनाच पुढे घेऊन जाऊ,त्यांनाच मदत करू,ती आपली आहेत म्हणून सांभाळून, मोठी करू हा विचार या देशात बुद्ध फुले आंबेडकर जन्माला आले होते आणि त्यांचे विचार या देशाने स्वीकारले आहेत याची पोच देणारा आहे. समतेच्या क्रांतीनायकाचा विचार ज्याच्या हृदयात आईने रोवला त्या विचारांचा मोठा वृक्षच डॉ हर्षदीप कांबळे यांच्या हृदयात बहरल्याचे काल दिसून आले.

महापुरुषाचा विचारवारस डॉ हर्षदीप कांबळे यांच्या रूपाने पुन्हा ह्याची देही पाहता आला. माझ्या सारख्या तरुणाला तर हे जीवनभर प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व राहणार आहे. एवढा कुणी त्याग करू शकतो, तेही आजच्या परिस्थितीत, आणि तेही एवढ्या मोठ्या पदावर असलेला माणूस.. आणि ह्या निस्सीम त्यागाला त्यांचा पत्नीचीही साथ आहे. मी स्तब्ध झालो होतो, मला भर भरून येत होते, हे सर्व पाहताना..आताही हे लिहीत असताना, तो मन ओलेचिंब करणारा प्रसंग शब्द बद्ध करताना डोळ्यातून अविरत अश्रू पडत आहेत….आणखी लिहिणे होत नाही इथेच थांबवतो…
..
पण त्याआधी बुद्धाच्या विचारावर चालणाऱ्या, त्यांचे विचार प्रत्यक्षात जगणारा आणि कुशल कम्म करणाऱ्या ह्या दानी आणि त्यागी जोडप्याला कोटी कोटी वंदन करतो.

जय भीम नमो बुध्दाय!

जयपाल गायकवाड, नांदेड

19 Replies to “स्वतःला अपत्य होऊ न द्यायचा निर्णय घेऊन गरजू मुलांवर खर्च करण्याचा डॉ.हर्षदीप कांबळे यांचा निर्धार

  1. डॉ.हर्षदीपजी कांबळे साहेब,
   सप्रेम जयभीम.
   आपला निर्णय आत्ताच वाचला.खूपच घालमेल होऊ लागली आहे.आपण आपला निर्णय बदलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.कारण आपण जे कार्य करीत आहात ते कार्य दुपटीने आपले अपत्य करतील.सम्राट अशोकाच्या मुलांनी जसा धम्म श्रीलंकेत स्थापित केला.तसेच आपले स्वतःचे अपत्य करतील अशी माझी आशा आहे..क.पया आपण निर्णय मागे घ्यावा ही विनंती.
   मी सेवानिवृत्त असून आपल्या कार्याचा प्रभाव माझ्यावर झाला आहे.त्यात खारीचा वाटा उचलण्याची माझी तयारी आहे.
   कृपया आपण आपला निर्णय बदलावा हिच विनंती.
   .

 1. सर तुम्ही 50 व्या वाड दिवसी घेतलेला निर्णयाला. ह्यात्स ऑफ.आपणास उतोरेत उतोरो धम्म आणि सामाजिक कार्य करण्यास. शरीर स्वास्त. आरोग्य. लाभो.

 2. मै डॉ हर्श दीप कांबले साहब को उनके उच्च विचारों को नमन करता हूं। और उन्हें जन्मदिन पर बधाई एवं अनेक शुभकामनाएं प्रेशित करता हूं ।
  भाई साहब और भाभी जी को अनंत बधाइयाँ देकर उनका गौरव करता हूं।
  नमो बुद्धाय।
  प्रकाश कांबले
  निलिमा कांबले

 3. मै डॉ हर्श दीप कांबले साहब को उनके उच्च विचारों को नमन करता हूं। और उन्हें जन्मदिन पर बधाई एवं अनेक शुभकामनाएं प्रेशित करता हूं ।
  भाई साहब और भाभी जी को अनंत बधाइयाँ देकर उनका गौरव करता हूं।
  नमो बुद्धाय।
  प्रकाश कांबले
  निलिमा कांबले

 4. Taryn boudhani Dr harsh kamble & Rojana vhanish kamble Yani Jo nirnay ghetala ah e ya nimityane mi Abhiwadan karto,ha Adharsh nawin tarunani swikar karawa jaibhim.Abhinandan

 5. आदरणीय साहेब जयभीम
  धम्म सेवा, धम्म प्रचार, समाज सेवा, सामाजिक कार्य आणि बुद्ध धम्म आणि बाबा साहेब यांच्या तत्वावर आधारित कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर IAS या पदावर राहून कार्य ….असे एकमेव उदाहरण संपूर्ण भारतात सद्यातरी दुसरे नाही.त्रिवार अभिनंदन साहेब.
  ५०वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभचितंन मंगलकामना.

 6. डॉक्टर हर्षदीप कांबळे सरजी व सौं. कांबळे मॅडमजी तुह्मी पन्नास वा जन्मदिनाच्या स्वतःहा व मॅडमजीने मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला त्या बाबत आपल्या विचारला मी नमन करतो व जन्मदिनाच्या व सोबतच पुढील भावी जीवनाच्या वाढचाल करीता शुभेच्छा देतो.
  पुन्हा आपल्या समोर नतमस्तक होऊन
  जय भीम करतो

 7. Great work for society
  I am proudly feeling sir
  100 yrs live sir
  ARUN SuDAM DEV
  7972737019
  9850282694

 8. तुमच्या सारखं खरंच कोणी नाही,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी आयष्यासाठी.. वाढदवसानिमित्त खूप शुभेच्छा…

 9. Dr.kamble sir and mrs kamble
  I am adv adsul residing at lokmanya nagar pada no.3. Sir i am following you since 15 years. I seen you that the intelligent poor socially economically backward students got alltimate god in you and these generations of 15 years keeping you live for ever.
  A person like me is shameful because i also got social background but always keep busy saying I have done what I have to do. I never accepted any big challenge nor tried for it’s success.
  I am happy within four walls of my family.
  At my ager pf 45 i was tried to jump out of my limits situation also good but my destiny my life partner left me alone and again I became lonely on the paths of social development.
  I again blessed by me for doing nothing.
  I appreciate that the decision you have taken on your 50th birthdate is long lasting i am happy that i myself see in you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *