ब्लॉग

दलित पात्रांना दुबळं दाखवण्यात इंडस्ट्री खूप मेहनत घेते?

रंजित अण्णाचा ‘कबाली’ हा मला प्रचंड आवडलेला चित्रपट आहे. अपेक्षेप्रमाणे मेन्स्ट्रीमने या फिल्मबद्दल फारसं बोलणं टाळलं तसंचं आपण प्रेक्षकांनी पण या फिल्म ला अँडरइस्टीमेट केलयं. खूप जास्त पोटेंशियल असलेली ती फिल्म होती. रजनीकांतच्या साऊथ एशियन स्टारडम चा पुरेपूर वापर पा.रंजितने या माध्यमातून केला. सेट मलेशिया निवडण आणी कबाली हे नाव देणं काय निव्वळ योगायोग नव्हता.

कबाली ही मेन्स्ट्रीम तमीळ इंडस्ट्रीच्या थोबाडात लगावलेली एक सणसणीत चपराक होती. “आतकाठी” पासून सुरू झालेल्या दलित सिनेमा नावाच्या ठिणगीचा हा पहिला व्हिजीबल स्फोट होता. मागच्या दोन दशकांपासून सिनेमॅटिक लिबर्टीमधून आलेली प्रतीकं कबालीतून पा. रंजितने अक्षरशः तोडून मोडून काढलीत.

नव्वदच्या सुरुवातीस कमल हसनच्या च्या तेवर मगन पासून जातव्यस्थेचं हिंसात्मक ग्लोरिफिकेश करणाऱ्या फिल्म यायला सुरू झाल्या. देशिवादीय गावगाड्याच्या नावाखाली जमीनदार जातींचं, सामंतशाही टाईप नायकांचं भरभरून उदात्तीकरण होऊ लागलं. त्या काळी ह्या वेव्ह मध्ये कमल,रजनीकांत सारख्या सुपरस्टार्सनी पण आपआपले ब्लॉकबस्टर दिलेत.

ह्यात गावकुसाबाहेर राहणारा जात समूहाचं नेहमी एकतर क्रिमिनलायजेशन केलं नाहीतर गिल्ट काँशियस मधून दाखवलं. ह्याच्यावर अन्याय झाला का तो हवेलिवरचा उच्चजातीय नायक आपली बुलेट काढून, वेष्टी कमरेला खेचून, त्याला वाचवायला येतो. मग हा त्याला ‘अय्यौ, स्वामी’ म्हणत पाय पडतो.

बरं, अजून बारकाईने बघायचं झालं तर कुठल्याही दलित पात्रचं अपियरन्स, आऊटफिट. एकतर हे पात्र कमीत कमी कपड्यात असतं. वेष्टी, लुंगी जरी घातली तरी सदरा टाकलेला नसतो. साऊदर्न तमीळनाडूचा टिपिकल डार्क कलर त्याचा दाखवण्यात येतो. दलित पात्रांना दुबळं दाखवण्यात इंडस्ट्री खूप मेहनत घेत. एकतर तुम्ही वाईट गुन्हेगार असता नाहीतर दुबळे घटक असता. लार्जर दॅन लाईफ इमेजवाला एक नायक म्हणून सोडा तिथं एक ‘सामान्य माणूस’ म्हणून आयडेंटि नाकारली जाते.

आता कबाली कडं बघा. त्यातला ‘नेरपुडा’ ह्या कर्णभेदी बॅकग्राऊंड थीमवर एका दलित नायकाची एन्ट्री हा एक माईलस्टोन होता. खूप मोठा माईलस्टोन. आजवर पडद्यावर फक्त डोमीनेटेड कास्टच्या पात्रांचीचं हिरॉइक एन्ट्री व्हायची. आता मुद्दा लक्षात आणून द्यायचा म्हणून बॉलीवूड मधील सिंघम ची एन्ट्री, पदमावत मधील एन्ट्री, बुलेट राजामधील एन्ट्री ही फक्त सोपी उदाहरणं. हे जर तमीळ कंटेक्समध्ये अजून खोलवर पाहायचं असेलतर नव्वदच्या काळातील तेवर मगन, सुंदरापंडीयन, कुटीपुली, नटामाई सारख्या फिल्म्स मधलं दलित प्रेझेंटेशन पाहावं लागेल.

‘कबाली’ आणि ‘काला’ चित्रपटाचे दिग्दर्शक पा.रंजित

परत कबालीकडं. रंजित अण्णाने पहिल्यांदा हे सगळे प्रस्थापित निकष फाट्यवर मारले. एका मुलाखतीत बोलताना रंजित सांगत होता की,’फिल्म्समध्ये दरवेळेस दलित पात्राला, वाचवायला मुक्ती द्यायला हवेलीवरचा उच्चजातीय नायकचं का येतो? त्या ऐवजी तो स्वतः च्या जागी उभा टाकून व्यवस्थेविरुद्ध का लढताना दाखवलं जात नाही? किंवा त्यात फक्त एक रेबेलीयन चा स्पर्क्स पण दाखवत नाहीत.

कबालीने हेच मोडीत काढलं. सुरुवातीच्या ‘तमीळ पडांगळ, ला इंगमारु वच्चीकूट्ट..मेसई मुरीकुट्ट..लुंगीए कटीकुट्ट….. कबाली डा’ ह्या डायलॉग मध्ये कबाली म्हणतो की ‘तमीळ बोलणारा, मिशी ठेवणारा, लुंगी घालणारा, तुझ्यापुढं झुकून बोला मालक म्हणणारा काबली वाटलो का काय?’ नंतर आपल्या सुटाबुटातल्या पेहराव्याकडं इशारा करत ‘कबाली डा’ ची डरकाळी देतो. हा सिन प्रचंड पावरफुल होता. खूप जास्त पावरफुल.

शेवटचा डायलॉग पा. रंजितचा आंबेडकरीझम कबाली स्पष्टपणे अधोरेखित करतो.

‘जरी माझी प्रगती तुला खुपत असली तरीही मी, प्रगती करणार!’

‘ह्याच सुटबुटकोटात राहणार!!’

‘तुझ्या समोरच्या खुर्चीवर पाय मोडून स्टाईलने ऐटीत बसणार!!’

‘डिल विथ इट!!’

लेखक – गुणवंत सरपाते, चेन्नई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *