बुद्ध तत्वज्ञान

सर्वांनी या विचारांचे पालन करणे आवश्यक

१) जातिभेद
गंगा, यमुना, अचिरवती, सरभु आणि मही अशा प्रकारच्या मोठ्या नद्या सुद्धा जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा त्यांचे पूर्वीचे नाव लोप पावते आणि त्यांना समुद्र असेच संबोधले जाते. त्याचप्रमाणे, लोक जेव्हा गृहत्याग करून भगवंतांनी शिकविलेला धम्म आणि विनयाचा स्वीकार करतात तेव्हा त्यांचे नाव, जात आणि वंश इ. बाबी लोप पावतात आणि त्यांना प्रव्रज्जित (भिक्षु) म्हणूनच ओळखले जाते.

२) आरोग्य आणि संतुष्टता
आरोग्य परम लाभ आहे आणि संतुष्टता परम सुख आहे.

३) दुष्ट मुख
प्रत्येक मनुष्य जन्मताच मुखात कुऱ्हाड घेऊन जन्मास येतो, ज्याच्या सहाय्याने मूर्खच मनुष्य दुष्ट (वाईट) बोलून स्वतःलाच कापून घेतो म्हणजे स्वतःचेच नुकसान करून घेतो.

४) उपदेश देण्याआधी आचरण करा.
माणसाने प्रथम जे उचित आहे त्यानुसार स्वतः वागावे आणि नंतरच दुसऱ्यांना त्याचा उपदेश करावा.

५) बोलण्याची कला
सत्य बोला, असत्य बोलू नका. जे सुखदायक आहे ते बोला, दुःखदायक बोलू नका, जे खरे आहे ते बोला, खोटे बोलू नका, तेच शब्द बोला ज्यामुळे पश्चाताप करावा लागणार नाही किंवा दुसऱ्यांचे नुकसान होणार नाही अशाप्रकारची वाचा खरोखरच चांगली आहे.

६) स्वतःला जिंका
जरी एखादा मनुष्य युद्धभूमीवर लाखो लोकांना पराजित करून विजयी होत असला तरी जो स्वतःवर विजय प्राप्त करतो. तोच खरा विक्रमी विजेता आहे.

७) मनाला सामर्थ्यवान बनवा.
ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झोताने एखादा पर्वत डगमगत नाही त्याचप्रमाणे बुद्धिमान मनुष्य निंदा आणि स्तुतीने डगमगत नाही.

८) मनाचा विकास करा.
ज्याप्रमाणे चांगल्याप्रकारे न शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी शिरते, त्याचप्रमाणे अविकसित (अनियंत्रित) मनात तृष्णा प्रवेश करते.

९) आत्मविश्वास
दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका; आत्मविश्वास विकसित करा.

१०) शहाणपणाने दुसऱ्यांची सेवा करा.
दुसऱ्यांची सेवा करताना स्वतःच्या आध्यात्मिक विकासाला विसरू नका.

One Reply to “सर्वांनी या विचारांचे पालन करणे आवश्यक

  1. khupach chan lekh aahe aani tyach barobr aapn ji mahiti aamhala purvta te khupach jast garje chi aahe karan ki tumchya marfatch amahala aamchya deshatil khup share aste thikN mahit hot aahe dhanyavad , jay bhim namo buddhay

Comments are closed.