जगभरातील बुद्ध धम्म

जगाला भारताची आठवण भगवान बुद्धामुळेच होते

जगामध्ये सर्वत्र भगवान बुद्धाचे तत्वज्ञान पुष्पाच्या सुगंधाप्रमाणे दरवळले आणि या सुगंधापासून एकही देश अलिप्त राहू शकला नाही. बौद्धधर्माच्या या उदात्त विज्ञाननिष्ठ व सर्वसमावेषक तत्वामुळेच तो जगाला शीरोधार्य ठरला आहे. जगाला भारताची आठवण भगवान बुद्धामुळेच होते. ह्या महान पुरुषाच्या जन्मभूमीला व त्यांनी सांगितलेल्या सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाच्या संदेश सारे जगस्मरण करते.

जगात बौद्धराष्ट्र म्हणून भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलँड, जपान, मंगोलिया, कोरिया, चीन, तिबेट यांचा उल्लेख करण्यात येतो. पण अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या राष्ट्रात देखील बौद्धधर्माचा प्रभाव, प्रसार व प्रादुर्भाव आहे.

अमेरिकेत ख्रिस्ती-धर्म प्रामुख्याने असला तरी तिथे दोन हजारांवर बौद्धभिक्षू, बुद्ध विहारे आणि बौद्ध अनुयायी आहेत. अमेरिकेतील फौजीशिपाई सुद्धा बुद्धानुयायी आहेत. ऐवढेच नव्हे तर बुद्धधर्माबद्दल आस्था म्हणून आपल्या गणवेषावर बौद्धधर्माचे चिन्ह लावतात व तसा कायदा त्यांनी करून घेतला आहे.

जर्मनीत तर हजारो बुद्धधर्म संस्था आहेत. जेथे बुध्दाचा प्रचार नाही अशा पृथ्वीच्या पाठीवर एकही देश नाही. भगवान बुद्ध हा जगप्रसिद्ध युगपुरुष होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *