इतिहास

मेरी फॉस्टर यांचे बौद्धधम्मीयांसाठी मोठे योगदान

मेरी रॉबिन्सचा जन्म इ.स. १८४४ मध्ये होनोलूलू येथे झाला. तिचा विवाह अमेरिकन धनाढ्य बँकर टी. आर. फॉस्टरशी होऊन तिचे नाव मेरी ऐलिझाबेथ फॉस्टर पडले. एकदा ती जहाजाने जपानला जात असतांना तिची गाठ श्रीलंकेचा तरुण भिक्खू अनागारीक धम्मपालाशी पडली. त्याने केलेला मैत्रीभावनेचा उपदेश ऐकून ती फार प्रभावित झाली. १९०२ मध्ये तिने ५०० डॉलर वे पुढील वर्षी २००० डॉलरचे दान केले. त्या धनराशीचा उपयोग अनागारिक धम्मपालाने सारनाथच्या ऋषिपतन मृगदाव येथील मूलगंधकुटी विहाराचा जीर्णोद्धार करावयासाठी केला.

त्यानंतर वर्षानुवर्षे मेरी फास्टरने दिलेल्या दानामुळे सारनाथ आणि इतर बौद्ध धम्मक्षेत्रांचा पुनरुद्धार सुरू झाला. इ.स. १९१८ व १९२३ मध्ये अनुक्रमे ५०, ००० व १०, ००, ०० डॉलर दान करून मेरी फॉस्टरने आधुनिक विशाखेचे काम केले. तिने इ.स. १९१३ मध्ये दान दिलेल्या ६०,००० डॉलर्सने श्रीलंकेमध्ये फॉस्टर रॉबिनसन हॉस्पिटल उघडण्यात आले.

One Reply to “मेरी फॉस्टर यांचे बौद्धधम्मीयांसाठी मोठे योगदान

  1. अभिनंदन ही उपयुक्त माहिती प्रसारित करण्याचे महान कार्य सुरू केल्यायाबद्दल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *