बातम्या

ऐतिहासिक ‘पेगॅसस’ एडिशनच्या बुलेटला लाजवेल अशी मॉडिफाइड ‘भीमा कोरेगाव’ एडिशन

पेगॅसस’ हि दुसऱ्या महायुद्धात ‘पेगॅसस पॅराशुट रेजिमेंट’ होती. त्यांच्या शौर्याच्या स्मरणात रॉयल एनफिल्डने ‘पेगॅसस’ हे बुलेटचे लिमिटेड एडिशन तयार केले होते. त्यावर विशेष लोगो लावण्यात आले होते. त्याच प्रकारे भीमा कोरेगावच्या शौर्याच्या स्मरणात नांदेडचे प्रसिद्ध आर्टिस्ट विजय रणवीर यांनी आपल्या बुलेटवर ‘पेगॅसस’ स्टाईलने १ जानेवारी १८१८ चा विशेष लोगो. त्यासोबतच महार रेजिमेंटच्या लोगो लावून ‘पेगॅसस’ एडिशनच्या बुलेटला लाजवेल अशी मॉडिफाइड ‘भीमा कोरेगाव’ एडिशन तयार केली आहे. यामुळे त्यांच्या बुलेटची चर्चा आणि आकर्षण तरुणांमध्ये होताना दिसते.

‘पेगॅसस’ जगभरात केवळ एक हजार युनिट्स

‘पेगॅसस’ एडिशन बुलेट

दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल एनफिल्डच्या ब्रिटनमधील कारखान्यात दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्माण करण्यात आलेल्या आरई/डब्ल्यूडी १२५ फ्लायिंग फ्लिआ मोटरसायकलवरून प्रेरणा घेऊन ‘पेगॅसस’ तयार करण्यात आली आहे. या मोटरसायकलची जगभरात केवळ एक हजार युनिट्स उपलब्ध आहेत. भारतामध्ये सर्व्हिस ब्राउन या युद्धाचा कालखंड दर्शवणाऱ्या रंगात या २५० मोटरसायकल्स २०१८ मध्ये विकल्या आहेत.

मोटरसायकलची किंमत दोन लाख ४९ हजार २१७ रुपये (मुंबईतील ऑन-रोड किंमत) ठेवण्यात आली होती. स्मरणोत्सवाचा भाग म्हणून तयार करण्यात आलेल्या या २५० लिमिटेड एडिशनमधील प्रत्येक मोटरसायकलसोबत खास तयार केलेले लष्करी धाटणीचे कॅनव्हासचे पॅनियर्स दिले असून, त्यावर पेगॅससचा लोगो आहे.

‘पेगॅसस पॅराशुट रेजिमेंटशी असलेला संबंध रॉयल एनफिल्डचा इतिहास मोटरसायकलिंगच्या क्षेत्रात किती खोलवर रुजलेला आहे याची आणखी एकदा आठवण करून देतो.

‘पेगॅसस’ बुलेट मध्ये विशेष काय?

फ्युएल टँकवर एका व्यक्तिगत स्टेन्सिल्ड सीरियल क्रमांक

या विशेष एडिशनमध्ये केवळ एक हजार मोटरसायकल्स जगभरात आहेत आणि यातील केवळ २५० भारतात आहेत. प्रत्येक क्लासिक पेगॅसस मोटरसायकलवर मरून आणि निळ्या रंगातील पेगॅसस चिन्ह (एम्ब्लेम) असून, पॅराशूट रेजिमेंटचे अधिकृत चिन्ह फ्युएल टँकवर एका व्यक्तिगत स्टेन्सिल्ड सीरियल क्रमांकासह आहे. रॉयल एनफिल्डचे प्रसिद्ध ‘मेड लाइक अ गन’ हे वाक्य बॅटरी बॉक्सवर असून मोटरसायकलच्या लष्करी परंपरेचे हे आणखी एक द्योतक आहे. हे मोटरसायकलवर बऱ्याच काळानंतर वापरण्यात आले आहेत. अस्सलता जिवंत ठेवत, पेगॅसस मोटरसायकलवरील खुणा या २५०व्या एअरबोर्न लाइट कंपनीने वापरलेल्या अस्सल वर्ल्ड वॉर टू फ्लाइंग फ्लिआवरील खुणांवरून बेतलेल्या आहेत. या खुणा सध्या कंपनीच्या यूके टेक्नोलॉजी सेंटरमधील अधिकृत संग्रहात आहेत.

पेगॅससचा लोगो

नांदेडचे विजय रणवीर यांच्या विषयी

विजय रणवीर

विजू आर्ट हे नाव नांदेडकरांसाठी तसं नवं नाही, त्याचप्रमाणे या नावाचा एक हरहुन्नरी आणि कलेच्या दुनियेतला कलंदर असलेल्या विजय रणवीर यांनाही नांदेडकरच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक अगदी शेजारच्या काही प्रातांतही आपल्या आगळ्या वेगळ्या कामामुळे लोक ओळखतात. त्यांनी दहा वर्ष मुंबईत चित्रपट क्षेत्रात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

नांदेड मध्ये सर्व महापुरुषांच्या जयंतीमध्ये विजय रणवीर यांनी बनवलेला सुंदर देखावा आकर्षणाचा विषय असतो. त्यासोबतच त्यांनी धम्म कार्यात विविध उपक्रम राबवतात. विद्यार्थाना अगदी लहान वयात बुद्ध समजावा म्हणून स्केचबुकची संकल्पना मांडली आणि अगदी सहजपणे लहान मुलांच्या हातात पर्यायाने डोक्यात बुद्ध पोहचविला अर्थात आर्थिक नुकसान सहन करावा लागला. दोन वर्षांपूर्वी विजय रणवीर यांनी भीमाकोरेगावचा ऐतिहासिक स्तंभाची वेगवेगळ्या आकारात प्रतिकृती तयार केली होती. आज असंख्य भीमा कोरेगावच्या प्रतिकृती आज महाराष्ट्रभर पोहचली आहेत ते विजय रणवीर यांच्यामुळेच…