जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानला आर्थिक संकट दूर करण्यासाठी एकच पर्याय : भगवान बुद्ध

पाकिस्तान आपल्या देशाचा नंबर एकच शत्रू असला तरी पूर्वी तो भारताचा भाग होता. आजही पाकिस्तानात बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडतात. सध्या पाकिस्तान आतंकवाद आणि धार्मिक कट्टरतेत अडकल्याने देश भिकेला लागलेला आहे. जगभरातून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आता पाकिस्तानला आपल्या देशातील बौद्ध स्थळांचे नूतनीकरण करावे लागत आहे. पाकिस्तानात बौद्ध धर्मियांचे महत्वाचे स्तूप आणि अवशेष आहेत ते पाहण्यासाठी बौद्ध पर्यटकांची संख्या वाढल्यास आर्थिक संकट दूर होईल अशी आशा त्यांच्या सरकारला आहे. तसेच अनेक बौद्ध राष्ट्रे त्यांना यासाठी आर्थिक मदत करत असल्याने पाकिस्तानला आता बुद्धाचा आधार घेऊनच आपले आर्थिक संकट दूर करावे लागेल.

तक्षशिला, पेशावर आणि स्वातंचे खोरे या ठिकाणी एकेकाळी बौद्ध धर्म उत्कर्षाला पोहोचला होता. येथील सिल्क रूटवरून चीन,जपान, आणि कोरिया या देशात बुद्धिझम गेला होता. या ठिकाणी असलेले प्राचीन स्तूप, संघाराम, शिलालेख आपल्याला बौद्ध धम्माच्या सुवर्ण युगाची आठवण करून देतात. येथे सापडलेली शिल्पे, कोरीवकाम केलेले दगड, धातूंची पात्रे, बुद्धमूर्ती यावर ग्रीक-भारतीय कलेचा प्रभाव आहे. तीच ही गांधार शैली म्हणून प्रसिद्ध आहे.

गांधार शैली

येथील पुरातन वास्तूंचे महत्व व पावित्र्य ओळखून कोरिया देशाने ही गांधार शैलीतील कला जपण्यासाठी पुढाकार घेतला. कोरिया दरवर्षी गांधार आर्टचे प्रदर्शनं पेशावर म्युझियमच्या सहकार्याने भरवीते. व त्यास जगभरातील जाणकार भेट देतात. २०१७ मध्ये २९ जून ते ३० सप्टेंबर असे इंटर आर्ट चॅनल व कोरियन कल्चर असोसिएशन यांनी पेशावर म्युझियम यांच्या सहकार्याने गांधार आर्ट प्रदर्शन सेउल येथे भरविले होते. व त्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता.

अतिरेक्यांच्या भीतीमुळे पाकिस्तानात परदेशातून पर्यटक येण्याचे प्रमाण पूर्वी कमी होते. तसेच फक्त काही शहराजवळील ठिकाणे सोडली तर ग्रामीण भाग तसा शांत आहे. तसेच इंटरनेटमूळे बौद्ध स्थळे उजेडात येत असून आता पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षी १.७५ मिलियन पर्यटकांनी पाकिस्तानला भेट दिली. त्यामुळे Pakistan Tourism Development Corporation ( PTDC ) खूश असून २०१७ मध्ये त्यांना एकूण $ 19.4 बिलियन मिळाले. येणारे पर्यटक भक्तिभावाने पुरातन स्थळीं जाऊन तेथील स्तूप, संघाराम बघतात याचे त्यांना अप्रूप वाटते. व त्यामुळे त्या ठिकाणांचे महत्व आता त्यांच्या ध्यानी येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *