बुद्ध तत्वज्ञान

वाचा! लोकांना तथागतांचे शब्द हवे होते; परंतु बुद्धाने त्यांना काय दिले?

एका सकाळी तथागत बुद्ध पांढऱ्या कमळाचे फुल घेऊन धम्मासनावर विराजमान झाले होते. त्या दिवशी बोललेच नाहीत. रोज बोलत असत. भिक्खू, भिक्खूणी आणि श्रावक प्रतिक्षेत होते. प्रतीक्षा खूपच वाढली. बुद्ध कमळाच्या फुलाकडे पहातच राहिले, बोलले काहीच नाहीत.

तेंव्हा त्यांचा शिष्य, महाकाश्यप हसू लागला. खदखदून हसू लागला. त्यांना हसताना पूर्वी कोणी पाहीले नव्हते. ते हसू शकतात असे कोणाला वाटतच नव्हते. सदैव धीर गंभीर. त्याच्या हसण्याच्या संपूर्ण सभागारात लहरी उठल्या. तेंव्हा बुद्धाने नजर वर केली. महा-काश्यपांना खुणेनेच जवळ बोलविले. ते सफेद कमळाचे फुल त्यांना दिले.

जमलेल्या श्रोत्यांना म्हणाले, ‘जे तुम्हाला सांगायचे होते ते मी सांगितले आहे जे सांगूनही न सांगता येण्यासारखे होते, ते मी महाकाश्यपांना सांगितले आहे.’ते सत्याचे दान होते.

महस्थविर महाकाश्यप हसले ते लोकांची मनोदशा पाहून. लोकांना शब्द हवे होते. बुद्ध तर मौन देऊन गेले.

3 Replies to “वाचा! लोकांना तथागतांचे शब्द हवे होते; परंतु बुद्धाने त्यांना काय दिले?

  1. महाकाश्यपा पासून पुढे थोडीशी वेगळी परंपरा मग पुढे झाली. महाकाश्यप परंपरेतील एक भिक्कू बोधीधर्म चीन मध्ये गेले आणी तिथे ही परंपरा मग झेन बुध्धीजम म्हणून प्रचलित झाली. पुढे तिचाच प्रसार जापान मध्येही झाला

Comments are closed.