जगभरातील बुद्ध धम्म

रेकी म्हणजे काय? ‘रेकी’ चा शोध कसा लागला?

रेकी म्हणजे जादू नाही, ती तंत्र नव्हे, मंत्र नव्हे किंवा काळी विद्या नव्हे. संमोहन शक्ती नव्हे, परसंमोहन नव्हे, ना कोणी पंथ, ना कोणता धर्म, ती केवळ एक योग-उपचार विधी आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ‘मनाच्या स्वास्थाबरोबरच शरीरस्वास्थालाही बरेच महत्त्व दिले गेले होते. मनाचे स्वास्थ्य उत्तम राखण्यास आणि मनाची शक्ती प्राप्त करावयास शरीराचे व्याधिमुक्त होणे अनिवार्य असते. ‘रेकी’ ही मन व शरीर यांच्यात संतुलन करावयास आणि मानसिक व शारीरिक स्वास्थाचा लाभ मिळविण्यासाठी एक सोपा आणि साधा नैसर्गिक उपाय आहे.

‘रेकी’चा शोध :

एकोणविसाव्या शतकात जपानमधील क्योटो शहरात डॉ मिकाओ उसुई नावाचा एक ईसाई शिक्षक राहत होता. एकदा त्याच्या एका विद्यार्थ्याने प्रश्न केला की प्राचीन काळी येशू ख्रिस्त केवळ हाताच्या स्पर्शाद्वारे लोकांचा उपचार करीत असत, हे म्हणणे सत्य आहे काय? ते खरे असल्यास त्याचा विधी कसा असतो, या प्रश्नाने डॉ. उसुई यांना विचलित केले. कारण त्याचे संपूर्ण उत्तर त्यांच्याकडे नव्हते. त्यांची जिज्ञासा जागृत झाली. त्यांनी आपल्या नोकरीचे त्यागपत्र विले आणि ते त्या विधीला शोधून काढावयास सज्ज झाले.

जपानमधील एका बौद्ध भिक्खूने त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचे मार्गदर्शन केले. जपान, अमेरिका, आणि चीन या देशाचे भ्रमण करीत करीत आणि अध्ययन करीत करीत ते भारतात आले. येथे येऊन त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी भारतीय बौद्ध साहित्याचे तिबेटमध्ये जाऊन अध्ययन केले. तेथे त्यांना हस्तस्पर्शाद्वारे उपचार करावयाचा विधी कमळ सूत्राद्वारे (Lotus-Sutra) उपलब्ध झाला. परंतु त्या विधीला आत्मसात करण्यासाठी चेतनेच्या जागृतीची आवश्यकता होती म्हणून ते जपानला परत आले.

बौद्ध भिक्खूच्या मार्गदर्शनानुसार त्यानी पवित्र मानल्या गेलेल्या कुरियामा पहाडाच्या शिखरावर जाऊन २१ दिवस उपवास करीत निरंतर ध्यान धारणेमध्ये मग्न राहिले. याप्रमाणे स्वतःच्या चेतनेस जागृत केल्याने हस्तस्पर्शाद्वारे उपचार करावयाची दिव्य शक्ती त्यांना प्राप्त झाली. त्यांच्या उरलेल्या जीवनामध्ये त्यांनी हजारो रोगग्रस्त लोकांना रोगमुक्त केले. या विद्येच्या ज्ञानाचा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी इतरांनाही प्रशिक्षित केले.

3 Replies to “रेकी म्हणजे काय? ‘रेकी’ चा शोध कसा लागला?

  1. रेकी मुळात शक्यामुणी भगवान बुद्धांनी शिकविली आहे. त्यांनी दिलेल्या प्रवचन ना शब्दबद करून ठेवला. कालांतराने ते पुस्तक अकराव्या दशकात डॉ मकाऊ उसुई यांना भेटली आणि त्यांची शोध सुरू झाला. संपूर्ण माहिती करिता प्रो मोहन श्रोत्रिय यांची रेकी रहस्य पुस्तक वाचा संपूर्ण माहिती भेटेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *