इतिहास

धर्मानंद कोसंबी – विसाव्या शतकातील बौद्ध धर्माचे स्कॉलर

आचार्य धर्मानंद कोसंबी हे पाली भाषा आणि साहित्य यांचे अभ्यासक होते. त्यांचा पाली भाषेचा व्यासंग प्रचंड होता. ते बुद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आणि विद्वान होते. गोव्यातील आपले वडिलोपार्जित घर त्यांनी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी वयाच्या तेविसाव्या वर्षी (सन १८९९) सोडले आणि नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश अशा देशांत धम्माचा अभ्यास केला. त्यांनी विपुल असे बौद्ध साहित्य जमा केले. […]