इतिहास

पाचशे वर्षांपूर्वीची कान्हेरी लेणी कशी दिसत होती? जॉन फ्रेयरच्या प्रवास वर्णनाचा वृत्तान्त

पाचशे वर्षापूर्वी महाराष्ट्र मुघल साम्राज्या विरुद्ध लढत होता तेंव्हा सात बेटांची मुंबई आकार घेत होती. त्यावेळी पोर्तुगीज,डच, फ्रेंच, इंग्रज यांच्यामध्ये व्यापारात मक्तेदारी स्थापन करण्याची अहमिका चालली होती. त्यांच्यात लढाया होत होत्या. महत्त्वाची बंदरे बळकावणे चालले होते. सन १६७० मध्ये मुंबई किल्ल्याच्या आजूबाजूचा सखल परिसर भरतीच्या पाण्यात बुडत असे. या रोगट मुंबईवर त्यावेळी पोर्तुगीजांचे राज्य होते. […]

लेणी

बोधिसत्व अवलोकितेश्वर; दहा मुख कोरलेले एकमेव शिल्प कान्हेरीच्या लेणीत

भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर तिथल्या कलावास्तूवर बौद्ध काळातील तत्त्वाचा व तत्त्वज्ञानाचा परिणाम झालेला दिसून येतो. बौद्ध चैत्य ,स्तूप, विहार यांच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा जाज्वल्य इतिहास अजरामर झाला आणि येणाऱ्या पिढीला तो आदर्श ठरला. लेणी चैत्यगृह यावरील शिल्पकलेमध्ये बौद्ध प्रतीके व बौद्ध देवता यांचा समावेश केला गेला. बुद्धकालीन वास्तुवैभवा मुळे भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत […]

ब्लॉग

कान्हेरी लेणी पन्नास वर्षांपूर्वीची

बोरिवलीची ‘कान्हेरी लेणी’ म्हणजे मुंबईच्या सान्निध्यात असलेला सर्वात सुंदर प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा होय. इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.११ व्या शतकापर्यंत विकसित झालेल्या या लेण्या म्हणजे मुंबईचा एक अनमोल ठेवा आहे. सुंदर बुद्ध शिल्पे, स्तुप, चैत्यगृह, विहार, सभागृह, निवासस्थाने, शिलालेख, पाण्याची असंख्य कुंडे, बोधिसत्व आणि पद्मपाणी बुद्ध यांची शिल्पे असा असंख्य बौद्ध संस्कृतीचा अनमोल […]

लेणी

कान्हेरी बौद्ध लेण्यांचे चीन जपानचे कनेक्शन?

कान्हेरी बौद्ध लेण्यांतील दृश्य मुंबई जवळील एका बेटावरील या बौद्ध लेणी आहेत.या बौद्ध लेणी २००० वर्षे प्राचीन असून महाराष्ट्र राज्याला लाभलेला हा वारसा आहे. कान्हेरी पर्वताचे नाव तेथील एका शिलालेखांत ‘कान्हासील’ असे दिले आहे. कान्हेरीला ‘कान्हागिरी’ किंवा ‘कृषगिरी’ असेही म्हटले आहे. येथे एकूण १२८ लेणी आहेत. १०७ विहार आणि ५ चैत्यगृह आहेत. इसवी सन पूर्वी […]