बातम्या

घर बांधकामा दरम्यान सापडलेली १७०० वर्षे जुन्या बुद्धमूर्तीची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानातील मर्दान येथील तख्तभाई भागात एका घराचे बांधकामासाठी खोदकाम चालू असताना सापडलेल्या प्राचीन बुद्धमूर्तीची तोडफोड केल्याबद्दल खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी शनिवारी चार जणांना अटक केली आहे. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार हा परिसर प्राचीन काळी गांधार प्रांत होता. सापडलेली मूर्तीसुद्धा गांधार शैलीतील आहे. आज शनिवारी पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये एक व्यक्ती हातोडीने बुद्धाची […]

जगभरातील बुद्ध धम्म

१७०० वर्षांपूर्वीचे बौद्ध शिल्प सापडले; गांधार शिल्प शैलीचा उत्कृष्ट नमुना

पाकिस्तानातील तक्षशिलापासून काही मैलांच्या अंतरावर असलेल्या भामळा गावाजवळ खानपूर तलावाच्या पाण्याच्या वरच्याबाजूला एक ऐतिहासिक बौद्ध शिल्प सापडले आहे. हे बौद्ध शिल्प गांधार शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असल्याचे दिसते. भामळा येथील पुरातन स्थळी एक स्तूप सुद्धा आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना सुरुवातीला या ठिकाणी काही अवशेष मिळाले होते. या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर बुद्धांच्या शिल्पांचा शोध लागला आहे. तसेच याठिकाणी एक […]

जगभरातील बुद्ध धम्म

ठिकऱ्या उडालेल्या बुद्ध शिल्पाची केली जुळवाजुळव

तालिबान या अतिरेकी संघटनेने २००१ मध्ये काबूल म्युझियम मधील गांधार शैलीचे मोठे बुद्ध शिल्प उध्वस्त केले होते. त्यामुळे ठिकऱ्या उडालेल्या या शिल्पाचे ७५० तुकडे गोळा करून म्युझियम मधील तळघरात ठेवले होते. शिकागो विद्यापीठ संशोधकांनी ते तुकडे पुन्हा जोडण्याचे ठरविले. या कामासाठी काबूल येथील अमेरिकन राजदूत यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार कोडे सोडविल्या प्रमाणे शिल्पाचा […]