ब्लॉग

आज केरळमधे घडलेल्या प्रसंगाने तथागत बुद्धाला रडू कोसळलं असतं

नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतू ते जयमंगलानि… लहानपणी देवदत्तानं बाणाने मारलेला राजहंस बुद्धाने राजनिवाड्याने जिंकला होता. सिद्धार्थाच्या भूतदयेचा तो पहिला आविष्कार होता.सिद्धार्थ बुद्ध झाला आणि देवदत्ताने देखील बुद्धाच्या संघात प्रवेश केला, पण हरप्रकारे बुद्धाला नामोहरम करण्याचा प्रयत्न त्याने सुरूच ठेवला. संघात राहून तथागतांच्या विरोधात कारस्थानं रचली. एकदा नालागिरी नावाच्या […]

इतिहास

तथागत म्हणाले येथे कोणतेही दुःख किंवा संकट नाही ; वाचा यशाची धम्मदीक्षा

वाराणसी नगरीत श्रेष्ठीपुत्र यश वास्तव्य करीत होता. तो युवा होता. त्याची शरीरयष्टी आकर्षक होती. तो आपल्या माता पित्यांना प्रिय होता. तो वैभव संपन्न होता. तो अमाप संपत्तीचा स्वामी होता. त्याच्याकडे सेवक – सेविका मोठ्या संख्येने होत्या. त्याचे अंत:पूर मोठे होते. तो आपले जीवन नृत्य, गायन आणि इंद्रियजनित भोगविलासात व्यतीत करीत होता. त्याचे जीवन भोगविलासांनी पूर्णपणे […]

बुद्ध तत्वज्ञान

आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक

तथागताची देशना होती की, आत्मा नाही. तथागताची अशीही मान्यता होती की पुनर्जन्म आहे. बुद्ध परस्पर विसंगत अशा दोन सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे असे दोषारोपण करणारे काही कमी नव्हते. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा शक्य आहे. परंतु यात विसंगती नाही. आत्म्याचे अस्तित्व नसतानाही पुनर्जन्म शक्य आहे. आंब्याची कोय असते. ही कोय […]

बुद्ध तत्वज्ञान

तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी, त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये

बुद्धाने करुणेला धम्माची इतश्री मानले नाही. करुणा म्हणजे मनुष्यमात्राप्रती प्रेम. बुद्ध त्याही पलीकडे गेले. त्यांनी मैत्रीचा विचार केला. मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणिमात्रांविषयी प्रेम. बुद्धाला असे वाटत होते की, माणसाची माणसांप्रती करुणा येथेच थांबू नये. माणसाने मनुष्यमात्रापलीकडे जावे, त्याने सर्व प्राणिमात्रांशी मैत्री जोडावी. जेव्हा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते, तेव्हा त्यांनी एका सुक्तात ही बाब […]

बुद्ध तत्वज्ञान

स्वतःच्या कर्मामुळे शारीरिक तशीच मानसिक सुख-दुखे निर्माण होतात

मनुष्याने स्वतः केलेल्या कर्माची फळे त्यास या जन्मामध्येच (म्हणजे शरीरात प्राण असेल तोवर) भोगावी लागतात. तथापि मनुष्याने स्वतः केलेल्या कर्माशिवाय सृष्टीमधील नियमानुसार ज्या घडामोडी होतात (जसे-भूकंप होणे, पूर येणे, दुष्काळ पडणे, ऊन, वारा, पाऊस, थंडी, इत्यादी) त्यामुळे देखील मानवाच्या वाट्यास सुखदुखे येत असतात. ती शारीरिक सुखदुःखे होत. परंतु मानवाच्या स्वतःच्या कर्मामुळे शारीरिक तशीच मानसिक सुख […]

बुद्ध तत्वज्ञान

भिक्खुचं वय कसे मोजतात? भगवान बुद्धाचे उत्तर हे होते…

एकदा असं घडलं…राजा बिंबिसार तथागत बुद्धांना भेटण्यासाठी आले होते. ते आसनस्थ झाले. नंतर ते तथागत बुद्धांशी बोलू लागले, तेवढ्यात एक वृद्ध भिक्खू तेथे आला, नतमस्तक झाला. तथागत बुद्धांनी त्या वृध्द भिक्खूला विचारले ‘आपले वय काय’? वृद्ध भिक्खू उत्तरला ‘भंते, नुकतच चौथं संपलंय’. राजा बिंबिसाराचा आपल्या डोळयांवर व कानावर विश्वास बसेना. हा म्हातारा भिक्खू, जास्त नाही […]