बुद्ध तत्वज्ञान

तथागत बुद्धांचा आपल्यासाठी अखेरचा संदेश काय होता?

सर्व संस्कार अनित्य आहेत , एवढे वस्तुस्थितिनिदर्शक विधान कोरडेपणाने, रूक्षपणाने वा अलिप्तपणाने भिक्खूपुढे ठेवून त्यांनी आपले श्वास थांबविले नाहीत. त्यांनी अखेरच्या श्वासांपूर्वी आणखी एक छोटेसे वचन उच्चारले. हे छोटेसे वचन केवळ तेथे उपस्थित असलेल्या भिक्खूसाठीच होते, असे नाही. ते वचन तथागतांच्या नंतर शेकडो वर्षांनी, असंख्य पिढ्या गेल्यानंतर आलेल्या तुम्हा – आम्हांलाही एका प्रसन्न प्रकाशाने उजळवून […]