इतिहास

त्रिरत्न चिन्हाचे महत्व; बुद्ध, धम्म व संघ यांची ही प्रतीके आता जगभर माहिती झाली

बुद्धांच्या शिकवणुकीचे भंडार त्रिपिटकमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. त्रिपिटक मध्ये बुद्धांच्या उपदेशा शिवाय दुसरे काहीही नाही. दुःख मुक्त जीवन, आदर्श जीवन कसे जगावे याची इत्यंभूत माहिती त्यामध्ये आहे. ज्यांनी या त्रिपिटकाचा अभ्यास केला तो मोठा ज्ञानी झाला. पण त्या त्रिपिटकातील बुद्ध तत्वज्ञानाची चिन्हे-रूपके त्याला आकलन झाली नाहीत तर त्याचे पांडित्य हे पोकळ आहे असे समजावे. बुद्धांच्या […]

इतिहास

हे बोलके व अप्रतिम शिल्प आहे तरी कुठे? बोधिवृक्षास वंदन करणारा हा ‘नागराज’ कोण?

“पताकांनी सुशोभित केलेला बोधिवृक्ष , त्याखाली असलेले वज्रासन. त्यावर सर्वत्र सुगंधी फुले पसरलेली. तिकडे वर आकाशात पाच फण्यांच्या नागावर आरुढ होऊन, उजवा हात पोटाशी बांधून, डाव्या हातात बोधिवृक्षास वाहण्यासाठी ताज्या फुलांचा गुच्छ घेतलेला, व चेहऱ्यावर लीनतेचा भाव आणून मोठ्या नम्रतेने बोधिवृक्षाच्या दर्शनासाठी थांबलेला नागराजा. उजव्या बाजूला त्यास अभय देत असलेले तथागत. तर, खाली डोईस पंचफणाधारी […]

ब्लॉग

‘बुद्ध’ म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश – पुज्य दलाई लामा

अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रुजला असून ‘बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश,’ असे म्हटले जाते, ते उगीच नाही. तुम्ही अगोदर स्वत: धम्माची पारख करा. परस्परांविषयी प्रेम बाळगा. सर्वधर्म समभाव यानुसार आपण चालले पाहिजे. भारत देश याचे एक उत्तम उदाहरण […]

इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ३

इ.स ६०० च्या दरम्यान राजा शशांकने बोधिवृक्ष व महाविहारातील बुद्ध प्रतिमा तोडण्याचा आदेश दिला. त्याने बंगाल प्रांतातील अनेक बुद्धविहार आणि स्तूप तोडून टाकले होते. अतिशय शिताफीने कामरूपचा राजा भास्करवर्मन ने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याच्या विश्वासू मंत्र्यांमार्फत वाचविले व साधारणतः इ.स. ६२० मध्ये बोधीवृक्षाभोवती २४ फूट उंचीची भिंत बांधली. इ.स. ६३७ मध्ये हुयान त्सांग ने […]