बुद्ध तत्वज्ञान

मरणाला सामोरे जाण्याची कला

भगवान बुद्धांनी अनेक सुत्तामध्ये सांगितले आहे की शरीर हे एके दिवशी रोगग्रस्त होणार आहे, एके दिवशी परिपक्व होणार आहे आणि नंतर त्याचा क्षय होणार आहे. थोडक्यात मृत्यू होणार आहे. पण ती एक मंगल घटना आहे. अमंगल असे काही नाही. नवीन जीवनाची सुरुवात आहे. परंतु त्याबाबत जनमानसामध्ये अनामिक भीती दिसते. त्याबाबत कोणीही बोलायला तयार नसते. अनेकांना […]

ब्लॉग

असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक

भगवान बुद्ध आणि महावीर दोघेही समकालीन होते. बुद्धांचा जन्म बिहार-नेपाळ सीमेजवळ असलेल्या लुंबिनी मध्ये झाला तर महावीर यांचा जन्म बिहार मधील वैशाली येथे झाला. महावीर यांचा जीवनकाल इ.स.पूर्व ५४० ते ४६८ असा मानला जातो. तर भगवान बुद्धांचा जीवनकाल इ.स.पूर्व ५६३-४८३ असा मानला गेला आहे. त्या काळात प्रामुख्याने श्रमण आणि वैदिक संस्कृती अस्तित्वात होती. भगवान बुद्ध […]

इतिहास

ज्ञानी कौण्डिन्य – भगवान बुद्धांचे पहिले शिष्य

बौद्ध साहित्यामध्ये बुद्धांचे शिष्य आनंद, सारिपुत्त आणि महामोग्गलांन प्रसिद्ध आहेत. पण याव्यतिरिक्त भगवान बुद्धांनी ज्या पंचवर्गिय भिक्खूंना प्रथम उपदेश केला त्यातील कौण्डिन्य यांचे स्थान सुध्दा अद्वितीय आहे असे दिसून येते. हे भगवान बुद्ध यांचे प्रथम शिष्य होते. यांना मध्यममार्गाचे प्रथम आकलन झाले. त्यांचा जन्म कपिलवस्तू जवळील द्रोणवस्तू या गावात झाला. कौण्डिन्य हे त्यांचे गोत्र व […]

ब्लॉग

प्रतिक्रांतीच्या विळख्यात भगवान बुद्ध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये धम्मचक्र प्रवर्तन करून, भारतीय विचार परंपरेच्या ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ संस्कृतीचा परीघ पूर्ण केला. त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देऊन भारतीय जनतेनेभारतीय विचार परंपरा व संस्कृतीवर बसलेली वैदिक धूळ झाडून काढायला सुरूवात केली. बहुजन संस्कृतीच्या पुनर्रचनेचे हे कार्य अद्यापही सुरू आहे. भारतीय राज्यघटनेच्या स्वीकाराने ही प्रक्रिया अधिकच गतिमान झाली.’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ […]

बुद्ध तत्वज्ञान

मज्झीम निकाय मधील ‘ककचूपम सुत्ताचे सार’ मनुष्य जातीस कायमस्वरूपी कल्याणकारी

त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक’ या मधील मज्झिम निकाय या विभागातील अनेक सुत्ते सुंदर उपदेशांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आढळतात. यातील उपदेश लोकांना समजेल असा असून कल्याणकारक आहे. या मज्झिम निकाय मधील ककचूपम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात….. “भिक्खुंनो, एखादा मनुष्य हातात कुदळ घेऊन येईल आणि म्हणेल ‘मी, या पृथ्वीचा नाश करीन’ असे बोलून तो इथे तिथे खोदू लागला, […]

इतिहास

म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ‘माझ्या धम्मात कसलीही सक्ती नाही’

ज्यावेळी भगवान बुद्धांवर सुखी गृहस्थजीवन उद्ध्वस्त करण्याचा आरोप होऊ लागला त्यावेळी तथागतांनी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. हे उत्तर आजच्या काळात सुद्धा लागू होते. मगध देशातील अनेक कुलपुत्र तथागताचे अनुगामी होत आहेत हे पाहून काही लोक क्रोधित झाले. असंतुष्ट झाले आणि म्हणू लागले.” श्रमण गौतम हा मातापित्यांना अपत्यहीन होण्यास कारण आहे. श्रमण गौतम हा भार्यांच्या […]

इतिहास

बिहारमधील पार्वती टेकडीवरील गुहा

बिहारमध्ये नावाडा जिल्ह्यात इंद्रशैल नावाची गुहा असलेली टेकडी पार्वती गावाजवळ आहे. बौद्ध साहित्यात लिहिले आहे की या टेकडीवरील गुहेत भगवान बुद्धांनी एकदा वर्षावास केला होता. तेव्हा तेथे इंद्रशैल हा आकाशदेव आला. व त्याने धम्मासंबंधी ४२ शंका बुद्धांना विचारल्या. तेव्हा बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. ही टेकडी जवळजवळ दीडशे फूट उंच असून अडीच हजार वर्षांपूर्वी […]

इतिहास

भगवान बुद्धांचा दहावा वर्षावास – रक्खीत वनखंड, भाग 12

नववा वर्षावास संपल्यानंतर, बुद्धांनी कोसंबी मध्ये काही काळ व्यतीत केला. त्याच काळात, दहाव्या वर्षावासाची सुरुवाती दरम्यान बुद्धांच्या भिक्खू संघात दोन गट पडले. एका शुल्लक कारणांवरून – एका छोट्याश्या चुकीमुळे त्या भिक्खूला कोणता दंड द्यावा, यावरून भिक्खू संघामध्ये वाद झाले आणि दोन गट पडले. बुद्धांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही […]

जगभरातील बुद्ध धम्म

या देशात बुद्ध पौर्णिमेला मद्यविक्री बंद केली जाते; मग भगवान बुद्ध तर भारतातील असूनही…?

या वर्षी बुद्ध पोर्णिमा १८ मे रोजी बऱ्याच देशांत साजरी करण्यात आली. यावेळी आशियातील जवळजवळ सर्व बौध्द देशात मद्यपानगृहे व वारूणी विक्री बंद होती. थायलंड देशात सुध्दा बुद्ध पौर्णिमेचा मोठा महोत्सव असल्यामुळे त्यादिवशी सर्व मद्यगृहे बंद होती. तिथल्या पंतप्रधानांनी दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी आदेशच निर्गमित केले आहेत की देशातील भगवान बुद्धांच्या ५ सणांदिवशी संपूर्ण […]

बुद्ध तत्वज्ञान

एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा!

प्राचीनकाळी राजगृहात एक गुंड राहात होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चन्द्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राही. परंतु, पूजा आणि बलिदान यांसारखे शारीरीक कष्टाचे विधी कितीही केले तरी, सतत तीन वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. […]