जगभरातील बुद्ध धम्म

बुद्ध धम्म स्वीकारणारे पहिले अमेरिकन व्यक्ती – कर्नल ओल्कोट

पंचशील ध्वजाचे जनक व श्रीलंकेत बुद्ध धम्माचे पुनरुत्थान करणारे अमेरिकन सैनिकी अधिकारी, पत्रकार, वकील कर्नल हेन्री स्टील ओल्कोट हे बुद्ध धम्म स्वीकारणारे सर्वप्रथम अमेरिकन व्यक्ती होते. ओल्कोट यांनी श्रीलंकामध्ये बौद्ध धम्माचे पुनरुत्थान केले. त्यामुळे त्यांना आजही श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील आणि सध्याच्या धार्मिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे अग्रगण्य नायक म्हणून गौरवले जाते.

1880 मध्ये कर्नल ओल्कोट हे दामोदर मालवलनकर यांच्याबरोबर गॅले (श्रीलंका) येथे गेले होते. तेथे त्यांनी पंचशील घेऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.

ओल्कोट यांनी 1885 मध्ये बौद्ध ध्वज तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या कमिटीमध्ये सल्लागार म्हणून काम केले. ओल्कोटच्या मदतीने डिझाइन केलेला बौद्ध ध्वज नंतर बौद्धांच्या जागतिक फेलोशिप आणि बौद्ध परंपरांच्या सार्वभौम प्रतीक म्हणून स्वीकारला गेला. श्रीलंकेत बुद्ध जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करून घेतली होती. त्यांनी श्रीलंकेत बौद्ध पुनरुत्थान करताना तीन महाविद्यालये आणि 205 शाळा स्थापन करण्यात आली, त्यापैकी 177 शाळांना शासकीय अनुदान मिळाले होते.

कोलंबो फोर्ट रेल्वे स्टेशनसमोर पुतळा

कोलंबो आणि गॅले येथील दोन प्रमुख रस्त्यांना ओल्कोट यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच कोलंबो फोर्ट रेल्वे स्टेशनसमोर त्यांचा एक पुतळा आहे. बौद्ध शिक्षणात दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांचे श्रीलंकेत अनेक स्मारके उभारले आहेत.

1879 मध्ये ओल्कोट भारतात आले आणि काही काळ त्यांनी बॉम्बे येथे राहण्यास सुरुवात केली. भारतातील त्यांनी स्थापन केलेल्या थियोसॉफिकल सोसायटीच्या पहिल्या अधिवेशनात “स्वदेशी” चळवळीचा मुद्दा पहिल्यांदा मांडला होता. त्यानंतरच्या काळात इंडियन नॅशनल काँग्रेसने हाच स्वदेशीचा मुद्दा उचलला होता.

One Reply to “बुद्ध धम्म स्वीकारणारे पहिले अमेरिकन व्यक्ती – कर्नल ओल्कोट

Comments are closed.