जगभरातील बुद्ध धम्म

व्हिएतनामचा ‘हँग’ पॅगोडा

‘हँग पॅगोडा’ (Hang Pagoda) व्हिएतनाम देशात असून तो ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या खडकाच्या पोकळीत वसलेला आहे. व्हिएतनामी भाषेत ‘हँग’ म्हणजे गुहा. ही गुहा २४ मी. खोल असून २० मी. रुंद आणि ३.२ मी. उंच आहे. या गुहेचे संपूर्ण क्षेत्रफळ जवळजवळ ४८० चौरस मीटर आहे.

ज्वालामुखीने तयार झालेले बेट ‘ली सन आयलँड ( Ly Son Island ) हे राजा ली किन टॉंगच्या ( १५८८- १६१९) काळात शोधले गेले. येथे या राजाने हँग पॅगोडा स्थापित केला. या गुहेत बुद्ध, अमिताभ बुद्ध, तथागत व मैत्रेय बुद्ध अशा तेथील प्रचलित असलेल्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.

पौर्णिमेला येथे असंख्य लोक दर्शनार्थ येतात. तसेच येथे पॅगोड्याच्या समोर गौनियन बोधिसत्व देवतेची मूर्ति आहे. तेथील स्थानिक कोळी लोकांचे ती समुद्रापासून संरक्षण करते असे तेथे मानले जाते.

-संजय सावंत